Thursday, May 2, 2024
Homeताज्या बातम्याSeema Haider : सीमा हैदरला पतीकडून जबर मारहाण ; डोळा काळानिळा, चेहरा...

Seema Haider : सीमा हैदरला पतीकडून जबर मारहाण ; डोळा काळानिळा, चेहरा सुजला ?

Seema Haider : प्रेमासाठी पाकिस्तानातून सीमा ओलांडून नेपाळमार्गे भारतात आलेल्या सीमा हैदरला (Seema Haider) मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. ज्यामध्ये सीमा हैदरच्या चेहऱ्यावर दुखापतीच्या खुणा दिसत आहेत. सचिन आणि सीमा यांच्यात भांडण झाले यानंतर सचिनने तिला बेदम मारहाण केली असा दावा करत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सचिन आणि सीमा यांच्यातील भांडणाच्या नावाखाली एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सीमा हैदर (Seema Haider) यांच्यावर हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. व्हिडिओमध्ये सीमा हैदरच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये सीमाचा डोळा एखाद्याने जोरात बुक्की मारावी, त्याप्रमाणे सुजून काळानिळा झाला आहे, याशिवाय तिच्या ओठांच्या आत जखम झालीय. आणि चेहऱ्यावर दुःख दिसत आहे.

दरम्यान, सीमा हैदर सोबत अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच, सीमा हैदरने देखील, माझ्यावर कोणाकडूनही हल्ला झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सीमा हैदरचे वकील एपी सिंह यांनीही हा व्हिडीओ खोटा असल्याचे म्हटले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर करुन त्यांना बदनाम करण्यासाटी हा व्हिडीओ तयार केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच ही बातमी दिशाभूल करणारी आहे. असेही ते म्हणाले.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सीमा हैदरचा पाकिस्तानचा पहिला पती गुलाम हैदर याने लवकरच भारतात येऊन मुलांना घेऊन जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एक व्हिडिओ जारी करताना गुलाम यांनी सीमाला सतत मारहाण आणि छळ केला जात असल्याचं म्हटलं आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

विरोधकांनी फक्त परिवाराचाच विकास केला – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुण्यात नोकरी शोधताय? सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

मोठी बातमी : अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांवर हल्ला, राष्ट्रवादी भाजपविरोधात आक्रमक

भरदिवसा पृथ्वीवर होणार तब्बल ४ मिनिट अंधार, वाचा काय आहे कारण !

धक्कादायक : ‘तुम्ही दोघे वेगवेगळ्या धर्माचे असताना एकत्र का फिरता’ म्हणत पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना मारहाण

निवडणूक आणि प्रचार ; राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी

मुद्रीत माध्यमाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक

समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या ४ जणांना नोटीस, १३ जणांचा शोध सुरू

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय