Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : १०० % मतदान जागृतीसाठी, बाईक रॅली अभियान

PCMC : १०० % मतदान जागृतीसाठी, बाईक रॅली अभियान

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : प्रबोधन मंच संस्था आणि पिंपरी व चिंचवड विधानसभा कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने येणा-या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी १ मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाचे औचित्य साधून भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २२७ दुचाकी व चार चाकी स्वार सहभागी झाले होते. PCMC

रॅलीचा प्रारंभ पिंपरी येथील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक (PIMPRI) येथून झाला, कार्यक्रमाच्या सुरूवतीस पिंपरी-चिंचवड (pcmc) महानगरपालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी पिंपरी चौक येथील भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि उपस्थितांना मतदानाची शपथ दिली. pcmc news

लोकशाहीवर निष्ठा ठेवून, निवडणुकांचे पावित्र्य राखून निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात,समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू” अशी शपथ घेतली आणि मतदान टक्केवारी वाढण्यासाठी आम्ही सामाजिक बांधिलकीतून जास्तीत जास्त प्रयत्न करू असा निर्धार व्यक्त केला.

यावेळी प्रबोधन मंच संस्थेचे दिपक शेंडकर, यांनी प्रबोेधन केले, हेमंत फुलपगार, श्रीरंग वाघ, अविनाश आगज्ञान यांच्यासह मावळ लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी आणि अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी मुकेश कोळप, विजय भोजने, राजाराम सरगर यांचे नियंत्रणात राजेंद्र कांगुडे, प्रिंस सिंह, दिपक येन्नावर, सचिन लोखंडे, ज्योती पाटील, संजय भाट, विजय वाघमारे यांनी जनजागृती केली. pcmc

प्रबोधन मंच हि स्वयंसेवी संस्था प्राधान्याने मतदान जागृती करिता सातत्याने काम करत आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुली राजकारणात उतरली, ‘या’ पक्षात केला प्रवेश

ब्रेकिंग : मिमिक्री आर्टिस्ट श्याम रंगीला पंतप्रधान मोदींच्या विरोधात लढणार निवडणूक

निवडणूकीच्या अगोदर अरविंद केजरीवाल यांना अटक का ? सर्वोच्च न्यायालयाचे ईडीला ५ प्रश्न

काँग्रेस मुख्यालयावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचताही येईना, प्रश्न विचारताच विद्यार्थ्यांची फजिती

ब्रेकिंग : महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात बदल

ब्रेकिंग : अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

ब्रेकिंग : कोरोना लसीचे प्रकरण सर्वोच्च न्यायलायात, बाधितांना भरपाई देण्याची मागणी

मोठी बातमी : माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

सर्वात मोठी बातमी : 100 हून अधिक शाळांत बॉम्ब ठेवल्याची धमकी, एकच खळबळ

संपत्तीसाठी लालची मुलाने बापाला बेदम मारले, व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय