Tuesday, May 21, 2024
Homeताज्या बातम्यासर्वात मोठी बातमी : 100 हून अधिक शाळांत बॉम्ब ठेवल्याची धमकी, एकच...

सर्वात मोठी बातमी : 100 हून अधिक शाळांत बॉम्ब ठेवल्याची धमकी, एकच खळबळ

School Bomb Threat : दिल्लीतील 100 हून अधिक शाळांना अज्ञात व्यक्तीकडून बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या धमक्यांमुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी (1 मे) रोजी सकाळी शाळांना बॉम्बची धमकी देणारा ईमेल आला, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (School Bomb Threat)

राजधानी दिल्ली आणि लगतच्या नोएडामधील अनेक शाळांना बुधवारी सकाळी एक मेल आला ज्यामध्ये बॉम्बची धमकी देण्यात आली होती. दिल्ली पोलीस आणि अग्निशमन विभागाला सतत कॉल येऊ लागले, एक एक करून त्यांना कळले की संपूर्ण दिल्ली-एनसीआरमध्ये अशा 100 हून अधिक शाळा आहेत, ज्यांना समान ईमेल प्राप्त झाले आहेत. यानंतर घबराट निर्माण झाली.

जेव्हा मुलं सकाळी शाळेत पोहोचली होती. नेमकं त्याच वेळी शाळांना बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या मिळाल्या आहेत, यामुळे संपुर्ण दिल्लीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ई-मेल मिळताच विद्यार्थ्यांना सुखरूप घरी पाठवण्यात आले असून पोलिसांच्या पथकांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे. (School Bomb Threat)

शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना शालेय वाहनाच्या मदतीने मुलांना सुखरूप घरी पाठवण्यात आले. या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली आहे. तसेच आता तपास जवळपास पूर्ण झाला असून पोलिसांना काहीही संशयास्पद आढळले नाही.

या धमक्यांचा उद्देश काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी सर्व शाळांमध्ये सुरक्षा कडक करण्यात आली आहे आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे.

School Bomb Threat

दिल्ली-एनसीआरमधील ज्या शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत, त्या शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता उद्या मुले शाळेत येऊ शकतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संध्याकाळपर्यंत ही माहिती उपलब्ध होईल, असे दिल्लीतील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्याच वेळी, नोएडातील प्रशासनाने उद्या, गुरुवार, 2 मे रोजी शाळा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

संपत्तीसाठी लालची मुलाने बापाला बेदम मारले, व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद

WhatsApp वर बिना इंटरनेट पाठविता येणार फाइल्स

अमित शहांचे हेलिकॉप्टर जोरदार वाऱ्यामुळे डगमगले, मोठी दुर्घटना टळली

निवडणूक प्रचारात कोल्हे आढळराव आमनेसामने !

ब्रेकिंग : अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढली, आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह

ब्रेकिंग : वसंत मोरे यांना निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह बहाल

केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा!

NCTE : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय