Tuesday, May 21, 2024
Homeताज्या बातम्याShirur Loksabha: अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढली, आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह

Shirur Loksabha: अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढली, आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह

Shirur Loksabha: शिरूर लोकसभा मतदार संघातून (Shirur Loksabha) एक महत्वाची माहिती समोर येत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच आता शिरुर मतदारसंघातही अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपुर्वीच बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधातील अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह मिळाले आहे. या नंतर आता शिरुर लोकसभेत मनोहर वाडेकर या अपक्ष उमेदवाराला तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह असणाऱ्या खासदार अमोल कोल्हेची (Amo kolhe) चिंता वाढणार आहे. या दोन्ही चिन्हांमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिरुर लोकसभेत (Shirur Loksabha) ट्रम्पेट हे चिन्ह मनोहर वाडेकरांना मिळालं आहे. मात्र, निवडणूक आयोगाने ट्रम्पेट या वाद्याचे मराठी भाषांतर तुतारी असे करण्यात आले आहे. ट्रम्पेट हे ब्रिटीश वाद्य असून बँड वादनात त्याचा समावेश होतो. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे. ही दोन्ही वाद्य वेगवेगळी असली तरी निवडणूक आयोगाने दोन्ही चिन्हांच्या उल्लेखात तुतारी या शब्दाचं साम्य ठेवलेलं आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला याचा काही फटका बसू शकतो.

शिरूर लोकसभेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिवाजी आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचे चिन्ह हे घड्याळ आहे. वंचित कडून डॉ.अन्वर शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर डॉ. अमोल कोल्हे मैदानात आहे. असे असताना आणखी एका उमेदवाराला तुतारी मिळाल्याने बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

SC, ST, OBC आरक्षण संपुष्टात आणणार अमित शहांचा व्हिडिओ व्हायरल, वाचा काय आहे सत्यता !

दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात होणार बदल, वाचा काय असेल बदल !

मोठी बातमी : दहावी बारावीचा निकाल “या” दिवशी लागणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा

धक्कादायक ! बहिणीच्या हळदीला नाचताना तरुणीला हार्ट ॲटक, जागीच मृत्यू

महाराष्ट्रातील जनता परिवर्तन करण्याच्या मनस्थितीत – शरद पवार

धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवत आत्महत्या

स्वतःसाठी खोके घेऊन गप्प बसणाऱ्यांना घरी बसवा – खासदार प्रियंका चतुर्वेदी

ब्रेकिंग: अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात, वाचा काय आहे प्रकरण !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय