Saturday, May 11, 2024
Homeताज्या बातम्याब्रेकिंग: अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात, वाचा काय आहे प्रकरण !

ब्रेकिंग: अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात, वाचा काय आहे प्रकरण !

Actor Sahil Khan : बहुचर्चित महादेव बेटिंग ॲप प्रकरणाची महत्वाची माहिती समोर येत आहे. महादेव बेटिंग ॲप (Mahadev Betting App) च्या प्रचार आणि प्रसार प्रकरणी अभिनेता साहिल खान (Actor Sahil Khan) याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी छत्तीसगढमध्ये जाऊन साहिल खानला (Sahil Khan) ताब्यात घेतले आहे.

Actor Sahil Khan चे महादेव बेटिंग ॲपशी कनेक्शन

अभिनेता साहिल खान ‘महादेव बेटिंग ॲप’चा भागिदार असल्याचे समोर आले आहे. महादेव बेटिंग या ॲपशी संबंधित 67 बेटिंग संकेतस्थळे असून ती सर्व परदेशातून नियंत्रित केली जात असल्याची माहिती तपासावेळी समोर आली होती. तसेच या अॅपच्या माध्यमातून १५ कोटी रुपयांची अफरातफरी करण्यात आल्याचीही माहिती आहे. या ॲप्सची सूत्रे हलवण्यासाठी दोन हजारहून अधिक बनावट सिमकार्ड आणि बनावट कागदपत्रांच्या आधारावर उघडलेली 1700 हून अधिक बँक खाती पैसे गोळा करण्यासाठी वापरली गेली आहेत.

सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीवरून महादेव ऑनलाईन गेमिंग-बेटिंग अ‍ॅप प्रकरणात 31 पेक्षा अधिक लोकांच्या विरूद्ध माटूंगा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) छत्तीसगढमध्ये (chhattisgarh) जाऊन साहिल खानला ताब्यात घेतले असून आता मुंबई मध्ये आणले आहे.

दरम्यान साहिलने मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Bombay High Court ) अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती पण कोर्टाने त्याची याचिका फेटाळून लावली आहे.

साहिल खान याची अटकपूर्व जामिनची याचिका फेटाळल्यानंतर तो मुंबईतून फरार झाला होता. मुंबईतून गोवा, गोव्यातून कर्नाटक, मग हैद्राबाद असा प्रवास करत तो छत्तीसगढमध्ये पोहोचला. आता साहिल खानच्या चौकशीवेळी महादेव बेटिंग ॲप प्रकरणात (Mahadev Betting App) आणखी काही नवीन माहिती समोर येते का हे पहावे लागणार आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम लोकसभेच्या मैदानात, ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर

मोठी बातमी : भांडूपमध्ये पैशाने भरलेली गाडी पोलिसांच्या हाती, राज्यभरात खळबळ

ब्रेकिंग : राज्यात आणखी एका बँकेला ९ कोटींचा गंडा, भाजप पदाधिकाऱ्यांना अटक

मोठी बातमी : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अभिनेता बेपत्ता

रेल्वेत प्रवासी तिकीट परीक्षक पदांच्या 8000+ जागांसाठी लवकरच भरती

शिरूर लोकसभेत शरद पवार घेणार सहा सभा, तर आदित्य ठाकरेंची होणार रॅली

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळप्रकरणी माजी खासदार बृजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ

ब्रेकिंग : राज्यातील “या” भागात ३ दिवस उष्णतेची लाट तर “या” भागात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

मोठी बातमी : नवनीत राणांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

ब्रेकिंग : शिक्षकांची आंतरजिल्हा बदली आता कायमची बंद!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय