Sunday, May 12, 2024
Homeताज्या बातम्याShashikant Shinde: शरद पवारांना मोठा धक्का ; उमेदवारावरच गुन्हा दाखल, अटकेची टांगती...

Shashikant Shinde: शरद पवारांना मोठा धक्का ; उमेदवारावरच गुन्हा दाखल, अटकेची टांगती तलवार

Shashikant Shinde : लोकसभा निवडणूकी अगोदरच शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे सातारा लोकसभेचे उमेदवार (Satara Lok Sabha Candidate) शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, शशिकांत शिंदे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवी मुंबई बाजार समिती एफएसआय वाटप कथित घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शौचालय घोटाळ्याचा (Navi Mumbai APMC Scam) गुन्हा दाखल असतानाच एफएसआय प्रकरणात आर्थिक फसवणूक केल्याचा (FSI Case) दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सोबतच तत्कालीन सचिव सुधीर तुंगार यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Shashikant Shinde यांच्यावर काय आरोप आहेत ?

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मसाला मार्केट मधील 466 गाळेधारकांना जादाचे बांधकाम करण्यासाठी 600 रूपये प्रति चौरस फुटाने परवानगी त्या वेळच्या संचालक मंडळाने दिली होती. रेडीरेकनरचा दर 3066 रूपये असताना फक्त 600 रूपये आकारले गेल्याने शासनाचे 62 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या विरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात 24 संचालक आणि सचिव असे 25 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे.

लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू असतानाच आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर हा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर गुन्हा दाखल झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

दरम्यान, नवी मुंबई बाजार समिती शौचालय कथित घोटाळाप्रकरणी दोन दिवसांपूर्वी याच घोटाळ्यात माजी संचालक संजय पानसरे व एपीएमसीचे कर्मचारी शिवनाथ वाघ यांना नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. याप्रकरणी शशिकांत शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी अंतरिम जामीन घेतल्याने त्यांची अटक टळली आहे. मात्र दुसरा गुन्हा दाखल झाल्याने शिंदेंची डोके दुखी वाढली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम लोकसभेच्या मैदानात, ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर

मोठी बातमी : भांडूपमध्ये पैशाने भरलेली गाडी पोलिसांच्या हाती, राज्यभरात खळबळ

ब्रेकिंग : राज्यात आणखी एका बँकेला ९ कोटींचा गंडा, भाजप पदाधिकाऱ्यांना अटक

मोठी बातमी : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अभिनेता बेपत्ता

रेल्वेत प्रवासी तिकीट परीक्षक पदांच्या 8000+ जागांसाठी लवकरच भरती

शिरूर लोकसभेत शरद पवार घेणार सहा सभा, तर आदित्य ठाकरेंची होणार रॅली

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळप्रकरणी माजी खासदार बृजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ

ब्रेकिंग : राज्यातील “या” भागात ३ दिवस उष्णतेची लाट तर “या” भागात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

मोठी बातमी : नवनीत राणांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

ब्रेकिंग : शिक्षकांची आंतरजिल्हा बदली आता कायमची बंद!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय