Thursday, May 9, 2024
Homeताज्या बातम्याब्रेकिंग : राज्यात आणखी एका बँकेला ९ कोटींचा गंडा, भाजप पदाधिकाऱ्यांना अटक

ब्रेकिंग : राज्यात आणखी एका बँकेला ९ कोटींचा गंडा, भाजप पदाधिकाऱ्यांना अटक

Malkapur urban Bank Scam : रिझर्व बँक सध्या अनेक बँकांवर कारवाई करताना दिसत आहे. राज्यातील अनेक खासगी बँकांवर निर्बंध लावले असताना आता आणखी एका बँकेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील मलकापूर अर्बन बँकेत घोटाळा (Malkapur urban Bank) झाल्याचे समोर आले आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील मलकापूर अर्बन बँकेत (Malkapur urban Bank) दुसऱ्याच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे बँकेत जमा करीत 9 कोटींचे कर्ज घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेप्रकरणी गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हे भाजप पदाधिकारी असल्याची माहिती समोर आहे. या घोटाळ्या प्रकरणात वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्याच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे बँकेत जमा करीत 9 कोटींचे कर्ज उचलल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा केल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी अभिषेक जगदीश जैस्वाल आणि अमरिश जगदीश जैस्वाल अशी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. त्यापैकी अभिषेक जैस्वाल हे भाजप पदाधिकारी आहेत. तसेच जिल्हा बँकेचा संचालक असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, घोटाळ्यामुळे निर्बंध घालण्यात आल्याने मलकापूर अर्बन बँकेचे हजारो खातेदार पैसा अडकल्याने हवालदिल झाले आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अभिनेता बेपत्ता

रेल्वेत प्रवासी तिकीट परीक्षक पदांच्या 8000+ जागांसाठी लवकरच भरती

शिरूर लोकसभेत शरद पवार घेणार सहा सभा, तर आदित्य ठाकरेंची होणार रॅली

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळप्रकरणी माजी खासदार बृजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ

ब्रेकिंग : राज्यातील “या” भागात ३ दिवस उष्णतेची लाट तर “या” भागात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

मोठी बातमी : नवनीत राणांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

ब्रेकिंग : शिक्षकांची आंतरजिल्हा बदली आता कायमची बंद!

नवनीत राणांच्या सभेसाठी महिलांना वाटले ३०० रूपये ? मध्यस्थाने घेतले ७०० रूपये, व्हिडिओ व्हायरल

मोठी बातमी : भाजप उमेदवाराकडून 4.8 कोटींची रोकड जप्त, निवडणूक आयोगाची कारवाई

मोठी बातमी : WhatsApp ची भारतातून सेवा बंद करण्याची धमकी

बिझनेस करायची आयडिया आहे? मग शासनाची “ही” योजना करेल मदत!

ब्रेकिंग : EVM बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय