Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पूर्णानगर येथे चैत्रगौरी पूजन, हळदीकुंकू समारंभ

PCMC : पूर्णानगर येथे चैत्रगौरी पूजन, हळदीकुंकू समारंभ

पिंपरी चिंचवड/ क्रांतीकुमार कडुलकर : चैत्र शुद्ध तृतीया म्हणजे गौरी तृतीया या दिवसापासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत चैत्रगौरी (Chaitragauri) पूजा करून महिनाभर हा उत्सव साजरा केला जातो.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे संस्कृती संवर्धन व विकास महासंघ विभागाच्या संस्कृती संवर्धन भजन महासंघ (चिखली विभाग) वतीने ‘चैत्रगौरीचे हळदीकुंकू’ श्री शनी मंदिर, पूर्णानगर येथे भव्य प्रमाणात संपन्न झाले. pcmc news

यावेळी संभाजीनगर, शाहूनगर, पूर्णानगर व शिवतेजनगर भागातील महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. तसेच महिला भजन महासंघाच्या सर्व विभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. pcmc news

संस्कृती संवर्धन भजन महासंघातर्फे भजन सेवेचा कार्यक्रम आयोजित केला होता. चैत्रगौरीची सजावट अगदी पारंपरिक पद्धतीने करून सर्वांना कैरीची डाळ, पन्हे, हरभऱ्याची ओटी देण्यात आली.

चैत्रगौरी भजनसेवा देणाऱ्या भगिनींनी अतिशय गोड, सुरेल आवाजात भजने गाऊन कार्यक्रमामध्ये प्रसन्नता, चैतन्य निर्माण केले. chaitra gauri हा कार्यक्रम सफल करण्यासाठी संस्कृती संवर्धन भजन महासंघाच्या अध्यक्षा अर्चना सोनार (योगगुरु), जयश्री करमरकर, पुष्पा साळुंखे, ज्योती जोशी, ज्ञानवती शर्मा यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय