Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयAir India च्या कर्मचाऱ्यांची अचानक सामुहिक सुट्टी, कंपनीची मोठी कारवाई

Air India च्या कर्मचाऱ्यांची अचानक सामुहिक सुट्टी, कंपनीची मोठी कारवाई

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसच्या 300 कर्मचाऱ्यांनी बुधवारी एकाच दिवशी आजारपणाची कारणे देऊन सामुहिक रजा घेतली. मोबाईल फोन बंद केले. ज्यामुळे बुधवारी दिवसभरात कंपनीची तब्बल 90 विमान उड्डाणे रद्द झाली. परिणामी एअर इंडियाच्या प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. याची गंभीर दखल नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DCGA) घेतली असून कंपनीकडून अहवाल मागविला आहे. (Air india)

दोन दिवसांपूर्वी अचानक सामूहिक रजा घेणाऱ्या 30 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. तसेच उर्वरित कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर हजर राहण्याचे कडक आदेश दिले आहेत, असे सूत्रांकडून समजते.

Air India

टाटा उद्योग समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसला उड्डाणे रद्द करावी लागली तर काही उड्डाणांना विलंब झाला. कोची, कालिकत, दिल्ली आणि बंगळुरू विमानतळांवर सेवा विस्कळीत झाली होती.

आखाती देशांमध्ये जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या अनेक प्रवाशांनी केरळमधील विमानतळांवर उड्डाणे रद्द झाल्याचा निषेध नोंदवला होता. देशांतर्गत उड्डाणे आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आल्यामुळे 15000 प्रवाशांना फटका बसला आहे.

प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल कंपनीच्या प्रवक्त्याने दिलगिरी व्यक्त केली होती, तिकिटांचा परतावा मिळेल असे आश्वासन दिले होते. कंपनीच्या गैरव्यवस्थापनाच्या निषेधार्थ 300 हून अधिक कर्मचाऱ्यांनी आजारी असल्याचे कारण देत सामूहिक रजा घेतली होती. अखेर एअर इंडिया एक्सप्रेस एअरलाइन्सने आपल्या रजेवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची मोठी कारवाई केली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील शरद पवार यांचे मोठे विधान

राज्यात ११ मतदारसंघात अंदाजे ६१.४४ टक्के मतदान

बारामतीत पोलिसांच्या ‘बंदोबस्तात’ पैशांचा पाऊस ? रोहित पवारांचे गंभीर आरोप

‘EVM’ मशीनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यास अटक

TMC : टाटा स्मारक हॉस्पिटल येथे भरती

मोठी बातमी : दिंडोरीतून माकपचे उमेदवार जे पी गावित यांचा उमेदवारी अर्ज मागे

Amethi काँग्रेसच्या कार्यालयावर मध्यरात्री हल्ला, अनेक वाहनांची तोडफोड

Ajit Pawar यांच्याकडून रोहित पवार यांच्या रडण्याची नक्कल

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय