Friday, May 10, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडMNS: मनसे 'आपला माणूस' म्हणून खा. बारणे यांचे काम करणार - रणजीत...

MNS: मनसे ‘आपला माणूस’ म्हणून खा. बारणे यांचे काम करणार – रणजीत शिरोळे

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) कार्यकर्ते मावळ लोकसभा मतदारसंघात ‘आपला माणूस’ म्हणून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barane) यांचे काम करतील व त्यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणतील, अशी ग्वाही मनसेचे सरचिटणीस रणजीत शिरोळे यांनी आज (शुक्रवारी) दिली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील (Maval loksabha 2024) शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी आकुर्डी, काळभोर नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या पिंपरी- चिंचवड (pcmc) मधील मनसे कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. MNS

बैठकीस खासदार बारणे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, महिला अध्यक्ष सीमा बेलापूरकर तसेच हेमंत डांगे, प्रीती सिंह परदेशी, राजू भालेराव, अनिकेत प्रभू, राजू सावळे, सागर लांघे, नितीन चव्हाण, अनिता पांचाळ, आकाश सागरे, अलेक्स झांजर, दत्ता देवतरासे, मयूर चिंचवडे, विशाल मानकरी, बाळा दानवले, नितीन सूर्यवंशी, राज अवसरे, विनोद भंडारी , कृष्णा बी रुणगीकर, काशिनाथ खजूरकर, चंद्रकांत दोडमणी यांच्यासह मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


देशाच्या प्रगतीची घोडदौड यापुढेही सुरू राहण्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे गरजेचे आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांनी महायुतीला (Mahayuti)बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आपल्याला देशाच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार व्हायचे आहे. त्यासाठी एकजुटीने, एकदिलाने ‘आपला माणूस’ आप्पा बारणे यांच्या हॅटट्रिकसाठी महाराष्ट्र सैनिक जीवाची बाजी लावतील, असे शिरोळे म्हणाले. खासदार बारणे म्हणाले की, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन संघटना प्रामाणिकपणे सर्वसामान्य माणसांसाठी काम करतात. स्वतःचा एकही उमेदवार न देता, केवळ देशहितासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याने राज साहेबांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. मनसेचे आपल्याला नेहमी सहकार्य व पाठिंबा मिळालेला आहे. निवडणुकीनंतरही आपण या सहकार्याची जाणीव ठेवू.

मनसेच्या वतीने शिरोळे यांनी खासदार बारणे यांचा सत्कार केला व त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. pcmc news

विशाल मानकरी यांनी सूत्रसंचालन केले तर अनिकेत प्रभू यांनी आभार मानले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : येत्या 24 तासात वादळी वाऱ्यासह महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता

स्वतःसाठी खोके घेऊन गप्प बसणाऱ्यांना घरी बसवा – खासदार प्रियंका चतुर्वेदी

ब्रेकिंग: अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात, वाचा काय आहे प्रकरण !

ब्रेकिंग : शरद पवारांना मोठा धक्का ; उमेदवारावरच गुन्हा दाखल, अटकेची टांगती तलवार

मोठी बातमी : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम लोकसभेच्या मैदानात, ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर

मोठी बातमी : भांडूपमध्ये पैशाने भरलेली गाडी पोलिसांच्या हाती, राज्यभरात खळबळ

ब्रेकिंग : राज्यात आणखी एका बँकेला ९ कोटींचा गंडा, भाजप पदाधिकाऱ्यांना अटक

मोठी बातमी : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अभिनेता बेपत्ता

रेल्वेत प्रवासी तिकीट परीक्षक पदांच्या 8000+ जागांसाठी लवकरच भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय