Sunday, May 12, 2024
Homeताज्या बातम्याWeather rainfall : येत्या 24 तासात वादळी वाऱ्यासह महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता

Weather rainfall : येत्या 24 तासात वादळी वाऱ्यासह महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता

Weather rainfall : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदललं असून दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळच्या सुमारास अचानक आकाशात ढग जमा होऊन पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाच्या शिडकावामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. अवकाळी पावसामुळं पिकांचे मोठं नुकसान होत असून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने (Weather rainfall ) पुढील ३ ते ४ दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसासह काही भागात उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून पुन्हा (IMD) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार येत्या २४ तासात मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.(Weather rainfall )

हवामान विभागाने पावसासोबतच वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. या काळात प्रति तास ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील बुलडाणा,अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली,भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात शनिवारी व रविवारी विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला आहे.(Weather rainfall )

हवामानाच्या अंदाजानुसार सोमवारी मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला दिला. तर मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे. त्याचबरोबर मंगळवारीही मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

स्वतःसाठी खोके घेऊन गप्प बसणाऱ्यांना घरी बसवा – खासदार प्रियंका चतुर्वेदी

ब्रेकिंग: अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात, वाचा काय आहे प्रकरण !

ब्रेकिंग : शरद पवारांना मोठा धक्का ; उमेदवारावरच गुन्हा दाखल, अटकेची टांगती तलवार

मोठी बातमी : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम लोकसभेच्या मैदानात, ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर

मोठी बातमी : भांडूपमध्ये पैशाने भरलेली गाडी पोलिसांच्या हाती, राज्यभरात खळबळ

ब्रेकिंग : राज्यात आणखी एका बँकेला ९ कोटींचा गंडा, भाजप पदाधिकाऱ्यांना अटक

मोठी बातमी : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अभिनेता बेपत्ता

रेल्वेत प्रवासी तिकीट परीक्षक पदांच्या 8000+ जागांसाठी लवकरच भरती

शिरूर लोकसभेत शरद पवार घेणार सहा सभा, तर आदित्य ठाकरेंची होणार रॅली

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय