Saturday, May 11, 2024
Homeताज्या बातम्याUjjwal Nikam: ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम लोकसभेच्या मैदानात, ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर

Ujjwal Nikam: ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम लोकसभेच्या मैदानात, ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर

Ujjwal Nikam : उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून एक महत्वाची बातमी येत आहे. भारतीय जनता पक्षाने उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून एक मोठा चेहरा मैदानात उतरवला आहे. भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर मध्य मुंबई (North Central Mumbai) लोकसभा मतदारसंघातून भाजप कुणाला तिकीट देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापले जाणार असल्याची पुर्वीपासूनच चर्चा होती. मात्र भाजपने देखील या जागेवरील उमेदवारी राखून ठेवली होती. अखेर शनिवारी भाजपने ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पंधरावी यादी जाहीर केली. यामध्ये मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्वल निकम अशी दुरंगी लढत होणार असल्याचं निश्चित झालं आहे.

कोण आहेत उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam)?

उज्ज्वल निकम हे प्रसिद्ध सरकारी वकील आहेत. त्यांनी जळगावात वकिलीच शिक्षण पूर्ण केलं. सरकारी वकील म्हणून 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटला त्यांनी चालविला. या सोबतच त्यांनी मुंबईवरील २६/११चा दहशतवादी हल्ला, खैरलांजी व सोनई हत्याकांड अशा विविध गुन्ह्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून बाजू मांडली होती व त्यात आरोपींनी फाशीची शिक्षा झाली होती. अशा अनेक खटल्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : भांडूपमध्ये पैशाने भरलेली गाडी पोलिसांच्या हाती, राज्यभरात खळबळ

ब्रेकिंग : राज्यात आणखी एका बँकेला ९ कोटींचा गंडा, भाजप पदाधिकाऱ्यांना अटक

मोठी बातमी : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अभिनेता बेपत्ता

रेल्वेत प्रवासी तिकीट परीक्षक पदांच्या 8000+ जागांसाठी लवकरच भरती

शिरूर लोकसभेत शरद पवार घेणार सहा सभा, तर आदित्य ठाकरेंची होणार रॅली

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळप्रकरणी माजी खासदार बृजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ

ब्रेकिंग : राज्यातील “या” भागात ३ दिवस उष्णतेची लाट तर “या” भागात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

मोठी बातमी : नवनीत राणांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

ब्रेकिंग : शिक्षकांची आंतरजिल्हा बदली आता कायमची बंद!

नवनीत राणांच्या सभेसाठी महिलांना वाटले ३०० रूपये ? मध्यस्थाने घेतले ७०० रूपये, व्हिडिओ व्हायरल

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय