Wednesday, May 8, 2024
Homeताज्या बातम्याTeacher Transfer: शिक्षकांची आंतरजिल्हा बदली आता कायमची बंद!

Teacher Transfer: शिक्षकांची आंतरजिल्हा बदली आता कायमची बंद!

Teacher Transfer : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदली संदर्भात एक महत्वाची माहिती हाती येत आहे. भरती झालेल्या शिक्षकांना पुन्हा दुसऱ्या जिल्ह्यात ड्यूटीसाठी जाण्याची गरज नाही. शिक्षकांना निवृत्त होईपर्यंत एकाच जिल्ह्यात ड्यूटी करावी लागणार आहे. (Teacher Transfer)

जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 11 हजार 85 शिक्षकांची भरती पार पडली असून, त्यांची निवड यादी देखील प्रसिद्ध झाली आहे. परंतू, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्यांच्या नेमणुका थांबल्या होत्या. आता त्याला हिरवा कंदील मिळाल्याने कागदपत्रांची पडताळणी होऊन त्यांना लवकरच नेमणुका होणार असल्याची माहिती आहे. या सोबतच निवृत्त होईपर्यंत शिक्षकांना एकाच जिल्ह्यात ड्यूटी करावी लागणार आहे.

ग्रामविकास विभागातर्फे काही दिवसांपूर्वी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविली होती. पण, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या शिक्षकांना स्वजिल्ह्यात येता आले नाही. आता निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर त्यांना कार्यमुक्ती मिळू शकते. पण, आंतरजिल्हा बदलीची ही शेवटची प्रक्रिया असणार आहे. नव्याने भरती होणाऱ्या शिक्षकांना निवृत्त होईपर्यंत त्याच जिल्ह्यात काम करण्यास तयार असल्याचे लेखी द्यावे लागणार आहे.

इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गावरील शिक्षक नव्याने निवड होऊन इयत्ता सहावी ते नववीपर्यंतच्या वर्गांसाठी गेला तर त्यास बाहेरील जिल्ह्यात जाण्यास परवानगी असणार आहे. मात्र, एकदा भरती झालेला शिक्षक त्याच पदावर काही वर्षांनी पुन्हा स्वजिल्ह्यात जाणार नाही. शालेय शिक्षण विभागाने यापूर्वीच त्यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : भाजप उमेदवाराकडून 4.8 कोटींची रोकड जप्त, निवडणूक आयोगाची कारवाई

मोठी बातमी : WhatsApp ची भारतातून सेवा बंद करण्याची धमकी

बिझनेस करायची आयडिया आहे? मग शासनाची “ही” योजना करेल मदत!

ब्रेकिंग : EVM बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

कांदा निर्यातीच्या धोरणावरून डॉ. कोल्हे यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला

मोठी बातमी : माजी आमदार जे.पी.गावित यांना माकप कडून उमेदवारी जाहीर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय