Thursday, May 9, 2024
Homeताज्या बातम्याAmravati : नवनीत राणांच्या सभेसाठी महिलांना वाटले ३०० रूपये ? मध्यस्थाने घेतले...

Amravati : नवनीत राणांच्या सभेसाठी महिलांना वाटले ३०० रूपये ? मध्यस्थाने घेतले ७०० रूपये, व्हिडिओ व्हायरल

Amravati : निवडणूक काळात वातावरण निर्मितीसाठी उमेदवारांना गर्दी जमवून जाहीर सभा घ्याव्या लागतात. गर्दी जमवण्यासाठी अनेकदा नेते मंडळी पैसे वाटतात. असाच एक व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचाराच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नुकतीच जाहीर सभा पार पडलेली. या सभेसाठी आलेल्या महिलांना प्रत्येकी ३०० रूपये दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शेअर करत विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे.

अमरावतीच्या (Amravati) भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ दि. २४ एप्रिल रोजी झालेल्या सभेत पैसे देऊन लोकांना आणले गेले होते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. याचा एक व्हिडिओ देखील रोहीत पवार यांनी सोशल मीडिया एक्स वर शेअर केला आहे. या व्हिडिओने एकच खळबळ उडाली आहे.

या व्हिडिओ मध्ये काही महिला सभेतून घरी जाताना. या महिलांना एक व्यक्ती येऊन पैसे मिळाले का? अशी विचारणा करतो. महिलांनी हो म्हटल्यानंतर तुम्हाला कमी पैसे मिळाल्याचे सांगून सदर व्यक्ती या महिलांकडून सर्व माहिती काढून घेतो. त्यात पैशांचे पाकीट देखील दिल्याचे दिसत आहे. या पाकीटात ३०० रूपये दिसत आहे. त्यावर सदर व्यक्ती दुसऱ्याने ७०० रूपये घेतल्याचे महालांना सांगताना दिसत आहे.

आमदार रोहित पवार यांनी अमरावतीत (Amravati) भाजपच्या सभेत उपस्थिती लावण्यासाठी महिलांना पैशांचं वाटप केलं गेलं, असा आरोप करत कमिशन खाणारी पार्टी म्हणजे भाजप अशी जोरदार टीकाही केली आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडिया एक्स वर शेअर व्हिडिओ शेअर करत लिहले आहे की, सगळीकडे कमिशन खाणारी पार्टी म्हणजे भाजप… यांना सभेला पैसे देऊन रोजाने माणसं आणावे लागतात हे आता जगजाहीर आहे, पण या गरीब माणसांच्या पैशातूनही हे कसं कमिशन खातात ते या व्हिडिओत बघा.. आता एकच मिशन..ज्यांनी खाल्ली दलाली त्यांना पाठवू घरी!, असं रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी सभेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेसाठी आलेल्या लाखो महिलांना पाणी वाटण्यासाठी आम्ही १०० ते १५० महिलांना काम दिले होते. पाणी पाजण्यासाठी त्यांना मानधन देण्यात आले होते. असे स्पष्टीकरण दिले आहे.

तसेच, रोहित पवार यांनी अमरावती येऊन पाहावे. याठिकाणी लाखोंच्या संख्येने महिला नवनीत राणा यांच्या पाठिशी उभ्या आहेत, लाखोंच्या संख्येने एवढ्या कडक उन्हाळ्यात सभेला आलेल्या लोकांना पाणीही द्यायचे नाही का?”, असा सवाल रवी राणा यांनी उपस्थित केला.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : भाजप उमेदवाराकडून 4.8 कोटींची रोकड जप्त, निवडणूक आयोगाची कारवाई

मोठी बातमी : WhatsApp ची भारतातून सेवा बंद करण्याची धमकी

बिझनेस करायची आयडिया आहे? मग शासनाची “ही” योजना करेल मदत!

ब्रेकिंग : EVM बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

कांदा निर्यातीच्या धोरणावरून डॉ. कोल्हे यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला

मोठी बातमी : माजी आमदार जे.पी.गावित यांना माकप कडून उमेदवारी जाहीर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय