Wednesday, May 8, 2024
Homeताज्या बातम्याWeather Update: राज्यातील "या" भागात ३ दिवस उष्णतेची लाट

Weather Update: राज्यातील “या” भागात ३ दिवस उष्णतेची लाट

Maharashtra Weather Update : राज्यात कोकण तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट परिस्थिती राहणार आहे.

कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील हवामान खात्याने केले आहे. (Weather Update)

आजपासून पुढच्या तीन दिवसांत मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्याला कडक उन्हाच्या झळांना सामोरं जावं लागण्याचा अंदाज आहे. उत्तर कोकणात 28 आणि 29 एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं तापमानाचा पारा 40 ते 42 अंशावर जाण्याचा अंदाज आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामान होत असून नांदेड, परभणी, जालना, अमरावती, वर्धा जिल्ह्यांत वादळी पावसाने तडाखा दिला. राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण असल्याने कमाल तापमानाचा पारा सरासरीपर्यंत कमी झाल्याचे हवामान विभागाने नोंदवले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : शिक्षकांची आंतरजिल्हा बदली आता कायमची बंद!

नवनीत राणांच्या सभेसाठी महिलांना वाटले ३०० रूपये ? मध्यस्थाने घेतले ७०० रूपये, व्हिडिओ व्हायरल

मोठी बातमी : भाजप उमेदवाराकडून 4.8 कोटींची रोकड जप्त, निवडणूक आयोगाची कारवाई

मोठी बातमी : WhatsApp ची भारतातून सेवा बंद करण्याची धमकी

बिझनेस करायची आयडिया आहे? मग शासनाची “ही” योजना करेल मदत!

ब्रेकिंग : EVM बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

कांदा निर्यातीच्या धोरणावरून डॉ. कोल्हे यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला

मोठी बातमी : माजी आमदार जे.पी.गावित यांना माकप कडून उमेदवारी जाहीर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय