Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडALANDI : आळंदीत रंगावली उपक्रमातून मतदार जनजागृती

ALANDI : आळंदीत रंगावली उपक्रमातून मतदार जनजागृती

मी मतदान करणार महिला बचत गटांचा संदेश

आळंदी / अर्जुन मेदनकर : राज्यासह सर्व देशात लोकशाहीचा उत्सव सुरु असून सर्वत्र विविध उपक्रमातून मतदारांत जनजागृती करून निवडणुकीतील विविध विषयावर जनजागृती केली जात आहे. या उपक्रमाचा भाग म्हंणून आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचे मार्गदर्शनातून केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाचे मार्गदर्शक सूचना प्रमाणे आळंदीत विविध ठिकाणी मतदार जनजागृती साठी रंगावली उपक्रमातून मतदार जनजागृती करण्यात आली. यास मोठा प्रतिसाद मिळाला. महिला बचत गटांतील महिला नागरिकांनी सहभाग घेऊन उपक्रमास उत्साही प्रतिसाद दिला.alandi news

आळंदीतील सोपानजाई पार्क आणि काळे वाडी येथील उपक्रमांत महिलांचा मोठा सहभाग मिळाला. यावेळी आळंदी नगरपरिषद लेखापरीक्षक संगीता येलमेवाड, विभाग प्रमुख वैशाली पाटील, आळंदी शहर महिला बचत गट अध्यक्षा सुवर्णा काळे, सोनाली रत्नपारखी, ललिता कदम, स्वाती पोळ, हर्षदा वाजे, मनीषा वाबळे, संगीता काळे, शुभांगी क्षीरसागर, किरण वाबळे, अनिता काळे, तेजस्विनी काळे यांचेसह परिसरातील महिलांची उपस्थिती होते. या उपक्रमातून महिलांनी रंगावली रेखाटत मतदान, मतदार, निवडणुकी विषयी घोष वाक्य रंगावली सोबत देऊन जनजागृती केली.

आळंदी नगरपरिषद लेखापरीक्षक संगीता येलमेवाड, विभाग प्रमुख वैशाली पाटील, आळंदी शहर महिला बचत गट अध्यक्षा सुवर्णा काळे यांनी या उपक्रमाचे यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. रंगावली पाहण्यास परिसरातून महिला नागरिकांनी गर्दी केली. आकर्षक रंगसंगतीतून महिलांनी रंगावली अल्प वेळेत रेखाटून उपस्थितांची दाद मिळवली.

यावेळी मतदानाची जनजागृती करताना रेखाटलेल्या रांगोळीतून अठरा वर्षाचे वय केले पार, घेऊया मताचा अधिकार, वोट फॉर बेटर इंडिया, मतदान के प्रति जागरूकता, रेडी टु वोट, एक दिवस मतदान तुमचे हितासाठी, तुमचे मत तुमचा अधिकार, मी मतदार, आपले मत आपला अधिकारी आड घोष वाक्य टॅग करीत रंगवळीतून महिलांनी जनजागृतीचे कार्य लक्षवेधी केले. मी मतदान करणार अशा घोषणा देत महिलांनी रंगावली उपक्रमात सहभागी घेतला. alandi news

या रांगोळी जनजागृती उपक्रमात आळंदी शहरातील दिशा महिला बचत गट, तेजस्विनी महिला बचत गट, ज्ञानदा महिला बचत गट, सोपान साई महीला बचत गट, सद्गुरू महिला बचत गट, जागृती महिला बचत गट यांचेसह महिला नागरिकांनी सहभाग घेत उपक्रम यशस्वी केला.

मतदाना मध्ये महिलांची टक्केवारी वाढावी म्हणून बचत गटातील महिलांनी रांगोळी कडून जनजागृती केली.या शिवाय आळंदी नगरपरिषदेच्या माध्यमातून मतदार स्लिपा घरोघरी वाटप सुरु करण्यात आले असून मतदार जनजागृती मोहीम सुरु आहे. मतदान केंद्रावर १३ मे रोजी विविध नागरी सेवा सुविधा मतदारांना देण्यात येत आहेत. मतदान दिनी मतदारांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे सूचना सर्व संबंधित विभाग प्रमुख यांना देण्यात आल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय