Tuesday, May 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : अनावश्यक ठिकाणी बसविण्यात आले गतिरोधक

PCMC : अनावश्यक ठिकाणी बसविण्यात आले गतिरोधक

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महापालिकेकडून निगडी – दुर्गानगर रस्त्यावर बसविण्यात आलेले गतिरोधक हे अपघाताला निमंत्रण ठरत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. हे गतिरोधक आवश्यकता नसलेल्या ठिकाणी बसविण्यात आले आहेत. जवळपास शाळा नाही, वळण सुद्धा नाही तरीसुद्धा गतिरोधक कशासाठी बसविले आहे कळत नाही. त्यांच्यापासून वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्याऐवजी रात्रीच्या वेळी येथे अपघात होण्याचे प्रमाण वाढल्याने वाहनचालकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. pcmc news

रस्त्यावर असलेल्या चौकापूर्वी किंवा वळण घेण्यासाठी असलेल्या जागेवर वाहनांची गती कमी करण्यासाठी हे गतिरोधक बसवणे आवश्यक आहे. परंतु या रस्त्यावर अशा ठिकाणी गतिरोधक न बसवता जिथे वाहनांची गती जास्त असते व जिथे आवश्यकताच नाही अशा ठिकाणी गतिरोधक बसविलेले आहेत. सदरचे गतीरोधक वाहनचालकांना पुढे गतिरोधक असल्याचे लक्षात येण्यासाठी येथील एकाही गतिरोधकावर रेडियमचे किंवा तत्सम रंगाचे दर्शनीय पट्टेही नाहीत. pcmc news

गतिरोधक असल्याचे दर्शविणारा फलकही नाही. यामुळे पुढे गतिरोधक असल्याचे वाहनचालकांच्या लक्षात न आल्याने या रस्त्यावर रात्रीच्यावेळी नेहमीच अपघात होत आहेत. तरी आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची गरज नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. सदर ठिकाणी बसविण्यात आलेले गतिरोधक जवळपास सव्वाशे मीटर लांब असून वाहनांची गती कमी करण्यासाठी ते येथील वाहतूक दिव्याच्या जवळपास असणे आवश्यक आहे. परंतु या रस्त्यावर अनावश्यक ठिकाणी कोणत्या आधारावर गतिरोधक बसविलेले आहेत हे पथविभागाने सांगावे.

शिवानंद चौगुले (सामाजिक कार्यकर्ते)

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अमित शहांचे हेलिकॉप्टर जोरदार वाऱ्यामुळे डगमगले, मोठी दुर्घटना टळली

निवडणूक प्रचारात कोल्हे आढळराव आमनेसामने !

ब्रेकिंग : अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढली, आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह

ब्रेकिंग : वसंत मोरे यांना निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह बहाल

केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा!

NCTE : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, पाकिस्तानी बोटीतून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त

SC, ST, OBC आरक्षण संपुष्टात आणणार अमित शहांचा व्हिडिओ व्हायरल, वाचा काय आहे सत्यता !

दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात होणार बदल, वाचा काय असेल बदल !

मोठी बातमी : दहावी बारावीचा निकाल “या” दिवशी लागणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय