Drugs seized : भारतीय तटरक्षक दलानं गुजरातच्या किनारपट्टीवर एक मोठी कारवाई केली आहे. भारतीय तटरक्षक दलानं पाकिस्तानी बोटीतून 600 कोटी रुपयांचे 86 किलो अमली पदार्थ जप्त (Drugs seized) केले आहे. अरबी समुद्रात ही कारवाई गुजरात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) यांच्या संयुक्त समन्वयानं रात्रभर ही कारवाई करण्यात आली.
Drugs seized
भारतीय तटरक्षक दलाने गुप्तचरांच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी ऑपरेशन केले. भारतीय तटरक्षक दल, दहशतवाद विरोधी पथक (ATS) तसंच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) यांनी संयुक्तपणे कारवाई करत पाकिस्तानी बोटीच्या 14 कर्मचाऱ्यांसह 602 कोटी रुपयांचे सुमारे 86 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. पाकिस्तानी बोटीतून नेमकं कोणतं ड्रग्ज जप्त (Drugs seized) करण्यात आलं, हे तटरक्षक दलानं अद्याप उघड केलेले नाही.
NCB आणि ATS अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या राजरतन या ICG जहाजाला संशयास्पद बोट दिसली. जहाजाच्या विशेष पथकानं संशयास्पद बोटीवर चढून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज असल्याची पुष्टी केली. ही कारवाई करण्यासाठी तटरक्षक दलाची जहाजे आणि विमाने तैनात करण्यात आली होती.
या कारवाईदरम्यान अटक टाळण्यासाठी बोटीवरील तस्करांनी एटीएस अधिकाऱ्यांवर बोट चढवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रत्युत्तरादाखल पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यावेळी पाकिस्तानी बोटीवर असणाऱ्या 14 जणांना देखील ताब्यात घेण्यात आलं.
25 आणि 26 तारखेच्या रात्री पाकिस्तानी बोटीची ओळख पटवण्यात आली. यानंतर एटीएसच्या अधिकाऱ्यांनी भारतीय तटरक्षक दलाच्या मदतीने अल रझा बोट पकडली. या काळात गोळीबारही झाला.
हे ही वाचा :
SC, ST, OBC आरक्षण संपुष्टात आणणार अमित शहांचा व्हिडिओ व्हायरल, वाचा काय आहे सत्यता !
दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात होणार बदल, वाचा काय असेल बदल !
मोठी बातमी : दहावी बारावीचा निकाल “या” दिवशी लागणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा
धक्कादायक ! बहिणीच्या हळदीला नाचताना तरुणीला हार्ट ॲटक, जागीच मृत्यू
महाराष्ट्रातील जनता परिवर्तन करण्याच्या मनस्थितीत – शरद पवार
धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवत आत्महत्या
स्वतःसाठी खोके घेऊन गप्प बसणाऱ्यांना घरी बसवा – खासदार प्रियंका चतुर्वेदी
ब्रेकिंग: अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात, वाचा काय आहे प्रकरण !
ब्रेकिंग : शरद पवारांना मोठा धक्का ; उमेदवारावरच गुन्हा दाखल, अटकेची टांगती तलवार