Thursday, October 10, 2024
Homeताज्या बातम्याAmit Shah Helicopter: अमित शहांचे हेलिकॉप्टर जोरदार वाऱ्यामुळे डगमगले, मोठी दुर्घटना टळली

Amit Shah Helicopter: अमित शहांचे हेलिकॉप्टर जोरदार वाऱ्यामुळे डगमगले, मोठी दुर्घटना टळली

Amit Shah Helicopter : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात होता होता ते थोडक्यात बचावले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे हेलिकॉप्टर सोमवारी बेगुसराय येथील जीडी कॉलेज येथून उड्डाण घेत असताना जोरदार वाऱ्याच्या दबावाखाली हेलिकॉप्टरचा तोल गेला. त्यावेळी अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरची मोठी दुर्घटना टळली.

बिहारमधील बेगुसराय येथे जाहीर सभेला संबोधित करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निघाले होते. त्यावेळी अमित शाह यांचे हेलिकॉप्टर टेक ऑफ करताना अचानक असंतुलित झाले. हेलिकॉप्टर पटनाच्या दिशेने पश्चिमेकडे उड्डाण करणार होते, पण ते उठताच पश्चिमेकडे न जाता पूर्वेकडे घसरले. जोरदार वाऱ्यामुळे हेलिकॉप्टर डगमगले. बेगुसराय येथे जोरदार वाऱ्याचा फटका त्यांना बसला. सोमवारी (२९ एप्रिल) रोजी अमित शहा हे एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले.

पायलटने शहाणपणा दाखवत हेलिकॉप्टर मागे वळवले आणि नंतर उड्डाण घेतले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, केंद्र सरकारने असे काहीही घडले नसल्याचे म्हटले आहे.

Amit Shah Helicopter

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे हेलिकॉप्टर उड्डाण (Amit Shah Helicopter) करताना असंतुलित असल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बेगुसराय येथे सभेत शाह यांनी काँग्रेससह विरोधी आघाडी ‘इंडिया’मध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांवर जोरदार निशाणा साधला.

दरम्यान, भाजपने बेगुसरायमधून केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना पुन्हा तिकीट दिले आहे. येथे महाआघाडीने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते अवधेश कुमार राय यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीत गिरीराज सिंह यांनी कन्हैया कुमारचा पराभव केला होता.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

निवडणूक प्रचारात कोल्हे आढळराव आमनेसामने !

ब्रेकिंग : अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढली, आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह

ब्रेकिंग : वसंत मोरे यांना निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह बहाल

केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा!

NCTE : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, पाकिस्तानी बोटीतून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्तकेमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा!

SC, ST, OBC आरक्षण संपुष्टात आणणार अमित शहांचा व्हिडिओ व्हायरल, वाचा काय आहे सत्यता !

दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात होणार बदल, वाचा काय असेल बदल !

मोठी बातमी : दहावी बारावीचा निकाल “या” दिवशी लागणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा

धक्कादायक ! बहिणीच्या हळदीला नाचताना तरुणीला हार्ट ॲटक, जागीच मृत्यू

महाराष्ट्रातील जनता परिवर्तन करण्याच्या मनस्थितीत – शरद पवार

धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवत आत्महत्या

संबंधित लेख

लोकप्रिय