Tuesday, May 21, 2024
Homeताज्या बातम्याWhatsApp वर बिना इंटरनेट पाठविता येणार फाइल्स

WhatsApp वर बिना इंटरनेट पाठविता येणार फाइल्स

WhatsApp : लवकरच, तुम्ही इंटरनेट कनेक्शनशिवाय WhatsApp वर मित्र आणि कुटुंबियांना फाइल्स पाठवू शकाल! WhatsApp ला त्यांच्या अॅपमध्ये ऑफलाइन मेसेजिंगची नवीन सुविधा आणण्याची योजना आहे, ज्यामुळे तुम्ही डेटा कनेक्शन नसतानाही फाइल्स पाठवू आणि प्राप्त करू शकाल.

WhatsApp एका मोठ्या फीचरवर काम करत आहे, आता WhatsApp वर मीडिया आणि फाइल्स पाठवण्यासाठी इंटरनेटची गरज भासणार नाही. नवीन फीचरबाबत लीक रिपोर्ट्स समोर आला आहे. त्यानुसार फोटो, व्हिडिओ, म्युझिक आणि डॉक्युमेंट्स फाईल पाठविण्यासाठी इंटरनेटची गरज भासणार नाही. हे फीचर रिलीज झाल्यानंतर या फाईल ऑफलाइनही पाठविता येणार आहे.

व्हॉट्सॲपच्या फीचर्सचा मागोवा घेणाऱ्या WABetaInfo ने व्हॉट्सॲपच्या या नव्या फीचरची माहिती दिली आहे. अहवालात दावा करण्यात आला आहे की, इंटरनेटशिवाय शेअर केलेल्या फाईल्स देखील एनक्रिप्टेड आणि सुरक्षित असतील. नवीन फीचरचा स्क्रीनशॉटही समोर आला आहे.

काय आहे WhatsApp चे नवे फिचर

व्हॉट्सॲपच्या या आगामी फीचरची सध्या बीटा चाचणी सुरू आहे. नवीन वैशिष्ट्य Android च्या Nearby सिस्टमवर कार्य करते. Nearby ला आता Quick Share म्हटले जाते आणि ते जवळपासच्या दोन डिव्हाइसेसमध्ये फाइल शेअर करण्यासाठी ब्लूटूथद्वारे कनेक्शन तयार करते. म्हणजेच व्हॉट्सॲपच्या या नवीन फीचरद्वारे तुम्ही इंटरनेटशिवाय दूर बसलेल्या व्यक्तीला मेसेज पाठवू शकणार नाही.

आगामी फीचर वापरण्यासाठी, तुम्हाला तुमच्या फोटो गॅलरीत व्हॉट्सॲपला प्रवेश द्यावा लागेल. याशिवाय लोकेशनसाठीही परवानगी द्यावी लागणार आहे.

WhatsApp मध्ये येणारे हे फीचर ॲपलच्या AirDrop, ShareIT आणि Google च्या Quick Share प्रमाणे काम करेल. या तंत्रात, फायली सेल्युलर इंटरनेट आणि वाय-फाय कनेक्शनशिवाय सामायिक केल्या जातात.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अमित शहांचे हेलिकॉप्टर जोरदार वाऱ्यामुळे डगमगले, मोठी दुर्घटना टळली

निवडणूक प्रचारात कोल्हे आढळराव आमनेसामने !

ब्रेकिंग : अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढली, आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह

ब्रेकिंग : वसंत मोरे यांना निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह बहाल

केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा!

NCTE : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, पाकिस्तानी बोटीतून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त

SC, ST, OBC आरक्षण संपुष्टात आणणार अमित शहांचा व्हिडिओ व्हायरल, वाचा काय आहे सत्यता !

दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात होणार बदल, वाचा काय असेल बदल !

मोठी बातमी : दहावी बारावीचा निकाल “या” दिवशी लागणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा

धक्कादायक ! बहिणीच्या हळदीला नाचताना तरुणीला हार्ट ॲटक, जागीच मृत्यू

महाराष्ट्रातील जनता परिवर्तन करण्याच्या मनस्थितीत – शरद पवार

धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवत आत्महत्या

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय