Congress : देशात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. सर्वांच्या संपत्तीचे समान वाटप करण्याची तयारी काँग्रेसने केली असल्याचे मोदी म्हणाले. काँग्रेसची ही विचारसरणी म्हणजे तुमची मालमत्ता, सोने, चांदी, जमीन हडप करण्याचा डाव असल्याचे मोदी म्हणाले.
संपत्ती वितरण आणि कथित वारसा कर या मुद्द्यावर विद्यार्थ्यांनी काँग्रेसच्या विरोधात निदर्शने केली. अनेक विद्यापीठांचे विद्यार्थी काँग्रेस आणि त्यांच्या जाहीरनाम्याविरोधात निदर्शने करताना दिसले. विद्यार्थ्यांनी हातात वेगवेगळे फलक घेत काँग्रेस मुख्यालयाच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पत्रकारांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पत्रकारांच्या प्रश्नाला विद्यार्थ्यांनी मजेशीर उत्तरे दिली. त्यांच्यापैकी बहुतेकांना ना समस्या माहीत होती ना कारण. आता या आंदोलनाच्या अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्या आहेत.
Congress मुख्यालयावर आंदोलन
काँग्रेस मुख्यालयावर आंदोलन करण्यासाठी गेलेल्या बहुतेक विद्यार्थ्यांना आंदोलन कशासाठी आहे, हा मुद्दा काय आहे, कारण काय आहे, हेच माहित नव्हते. काहींना तर साधे बॅनर नीट वाचता आले नाहीत. या आंदोलनाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरांची मजाही नेटकरी घेत आहे.
दरम्यान, एका विद्यार्थ्यांला हातात असलेल्या प्लायकार्ड वरील वाचायला लावले असता त्याने urban naxal ऐवजी urban maxvell असे वाचले. ही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर ट्रेंन्ड होत आहे.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात बदल
ब्रेकिंग : अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या
ब्रेकिंग : कोरोना लसीचे प्रकरण सर्वोच्च न्यायलायात, बाधितांना भरपाई देण्याची मागणी
मोठी बातमी : माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
सर्वात मोठी बातमी : 100 हून अधिक शाळांत बॉम्ब ठेवल्याची धमकी, एकच खळबळ
संपत्तीसाठी लालची मुलाने बापाला बेदम मारले, व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
WhatsApp वर बिना इंटरनेट पाठविता येणार फाइल्स
IIIT : इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर येथे विविध पदांची भरती
AIIMS : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अंतर्गत भरती