पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : लोकसभा निवडणुकीनंतर लगेच राज्यात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरु झाली. त्यामुळे गेली चार-पाच महिने माझ्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे माझे सर्व सहकारी मित्र, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आरपीआय व इतर सर्व मित्रपक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अत्यंत प्रभावीपणे आपल्या मतदारसंघांमध्ये काम केले. त्या सर्वांच्या मोलाच्या योगदानामुळे मला प्रचार करताना खूप गती मिळाली. त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. (Mahesh Landge)
लोकशाहीच्या या उत्सवामध्ये देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर व माझ्यावर विश्वास ठेवून लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने आपला मतदानाचा अधिकार बजावला अशा सर्व मतदार बंधू- भगिनी, मायबाप- जनतेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. मला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार..! Mahesh Landge
जय श्रीराम..!
पिंपरी-चिंचवडकरांचा निरंतर विश्वास,
भोसरी मतदारसंघाचा आता शाश्वत विकास!
आपला विनित,
महेश किसनराव लांडगे,
आमदार, भोसरी विधानसभा. भाजपा, पिंपरी- चिंचवड.
हे ही वाचा :
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण; मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हीच कष्टकऱ्यांची इच्छा : बाबा कांबळे
पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला; बसमधील 38 जणांचा मृत्यू, 20 पेक्षा जास्त जण जखमी
Tarkarli beach : तारकर्ली एक नयनरम्य पिकनिक स्पॉट (Video)