Saturday, December 7, 2024
Homeविशेष लेखVeg Manchuriyan : व्हेज काेबी मंचुरीयन,घरी बनवा (video)

Veg Manchuriyan : व्हेज काेबी मंचुरीयन,घरी बनवा (video)

नेहमी तेच तेच खावून कंटाळा येतो मग काही वेगळं खायची इच्छा हाेते मग वाटतं बाहेर जाऊन खावे पण सध्या काेराेना असल्याने बाहेरचे पण खायचे टाळलेले बरे मग मुलांची पण फरमाइश हाेते की काहीतरी हाॅटेल सारखं बनव. (Veg Manchuriyan)

तेव्हा सर्वात आधी डाेळ्यासमाेर येते ते सर्वांच्या आवडीचे मंचुरीयन…मग आयत्या वेळेस बाकीच्या भाज्या नसल्या तरी मग काेबी येताेच मदतीला.

मग काय घरातलेच थाेडे जिन्नस घ्यायचे आणि साॅस तर असते घरात मग बनवायचे एकदम रेस्टॉरंट स्टाईल काेबी मंचुरीयन!

1975 मध्ये मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे स्वयंपाकी नेल्सन वांग यांनी व्हेज मांचुरियनचा शोध लावला होता.
जेव्हा एका ग्राहकाने त्याला मेनूमध्ये काय आहे, असे विचारले, त्याऐवजी नवीन डिश तयार करण्यास सांगितले होते. वांग यांनी कोबी आणि इतर भारतीय मसाले वापरून एक नवीन स्वादिष्ट डिश बनवली, म्हणजे चिरलेला लसूण, आले आणि हिरव्या मिरच्या, परंतु नंतर, गरम मसाला घालण्याऐवजी, त्याने सोया सॉस टाकला, त्याने पत्ता कोबी वापरून डिश संपूर्ण भारत आणि दक्षिण आशियामध्ये लोकप्रिय केली.

वास्तविक मांचुरिया मध्ये अशी काही डिश नाही, येथे फक्त एक लोकप्रिय शाकाहारी प्रकार चिकनच्या जागी फुलकोबी घेतो, आणि सामान्यतः गोबी मंचुरियन म्हणून ओळखले जाते. (Veg Manchuriyan)
इतर शाकाहारी प्रकारांमध्ये मुख्य घटक म्हणून मशरूम, बेबी कॉर्न आणि व्हेज बॉल यांचा समावेश होतो.
माझी रेसिपी व्हेज मंचुरीयन

व्हेज मंचुरियन रेसिपी ही एक लोकप्रिय इंडो-चायनीज रेसिपी आहे जी वेगवेगळ्या भाज्यांनी बनवली जाते,त्यानंतर त्याचे मिक्स करून गोळे बनवतात, तळलेले आणि तिखट मसालेदार सॉसमध्ये ते लेप केले जातात. हे व्हेज मंचुरियन बॉल्स तळलेले तांदूळ आणि नूडल्ससह परिपूर्ण साइड डिश बनवतात.
व्हेज माचुरियनच्या या रेसिपीमध्ये, स्टेप बाय स्टेप व्हेज मंचुरियन ड्राय आणि ग्रेव्ही दोन्ही प्रकारे बनवता येतात.

साहित्य : 1 कोबी, 3ते 4 चमचे कॉर्नफ्लोवर, 2 ते 3 चमचा मैदा, आलं,लसूण पेस्ट, रेड फूड कलर, तेल, मीठ, लाल मिरची पावडर

कृती : प्रथम कोबी उभा बारीक चिरून घ्यावे, तो स्वच्छ धुवून एका परातीत घ्यावे त्यात आलं लसणाची पेस्ट चवीनुसार मीठ , लाल मसाला, रेड फूड कलर टाकून मिक्स करावे त्या नंतर त्यात कॉर्नफ्लोवर आणि मैदा टाकावे व एकजीव करावे 15 मिंट साठी हे मिश्रण झाकून ठेवावे, 15 मिनीट नंतर तेल तापत ठेवावे तेल चांगलं तापले की त्याचे गोळे बनवावे, गॅसची फ्लेम मंद ठेवावी, कारण हे जळू शकतात जळले की, त्याची चव बिघडते. दोन्ही बाजुंनी परतवून घ्यावे आणि गरम गरम खावे.
मंचुरीयन तुम्ही शेजवान सॉस किंवा टोमॅटो केचप सोबत सुद्धा खाऊ शकता.

संबंधित लेख

लोकप्रिय