Sunday, December 8, 2024
Homeजुन्नरJunnar : श्री शिवछत्रपती महाविद्यालयात विविध सामाजिक उपक्रमासह दिवाळी साजरी

Junnar : श्री शिवछत्रपती महाविद्यालयात विविध सामाजिक उपक्रमासह दिवाळी साजरी

‘दिवाळी विथ माय भारत’ हा विशेष उपक्रम (Junnar)

जुन्नर (आनंद कांबळे) : श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने यावर्षी दिवाळीची सुरुवात विविध सामाजिक उपक्रम राबवत अनोख्या पद्धतीने करण्यात आली अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमारे यांनी दिली. 

केंद्र सरकारच्या खेळ व युवा मंत्रालयाच्या ‘दिवाळी विथ माय भारत’ या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबविले, यामध्ये दिवाळीच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर परिसर स्वच्छ केला, तसेच मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी यासाठी मतदार स्वाक्षरी मोहीम राबवली. (Junnar)

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या मदतीने राष्ट्रीय महामार्ग ५० नारायणगाव या ठिकाणी वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचाऱ्यांसह वाहतूक व्यवस्थापन करत वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. तर दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी श्री छत्रपती शिवाजी ग्रामीण रुग्णालय, जुन्नर या ठिकाणी रुग्णांस प्रत्यक्ष मदत करत ग्रामीण भागातील रुग्णांना शासकीय रुग्णालयात मदत केली अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ. महेंद्र कोरडे यांनी दिली. 

या अभिनव उपक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ महादेव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी प्रा विष्णू घोडे, प्रा जयश्री कणसे व प्रा मयूर चव्हाण यांनी केले. या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ऐन दिवाळीत भाग घेत विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. विलास कुलकर्णी व उपप्राचार्य डॉ रविद्र चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले. (Junnar)

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी

ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

संबंधित लेख

लोकप्रिय