Sunday, December 8, 2024
Homeजुन्नरजुन्नर येथील सभेतून जयंत पाटील यांची महायुतीवर जोरदार टीका

जुन्नर येथील सभेतून जयंत पाटील यांची महायुतीवर जोरदार टीका

जुन्नर (आनंद काबंळे) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला आहे, गुजरातचे मांडलिकत्व स्वीकारले आहे. केंद्र शासनाने महाराष्ट्राला सातत्याने दुजाभावाची वागणुक दिली आहे. राज्य शासन केंद्र शासनाला जाब विचारू शकत नाही. महाराष्ट्रातील उद्योग प्रकल्प गुजरातला नेले आहेत. भाजप व मित्रपक्षाने महागाई वाढविली आहे, अशी टीका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जुन्नर(Junnar) येथे केली. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, माजी आमदार दिलीप ढमढेरे, जुन्नर तालुका अध्यक्ष तुषार थोरात, ज्येष्ठ नेते अनंतराव चौगुले, शिवाजीराव खैरे, शरद लेंडे, जयवंत घोडके, अनिल तांबे, बाजीराव ढोले, मोहित ढमाले, अंकुश आमले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, शरद चौधरी, बाबा परदेशी, मोहन बांगर, गुलाबराव पारखे, सुनील मेहेर समीर भगत, चंद्रकांत डोके, सुरेखा मुंडे, सुरेखा वेठेकर, जितेंद्र बिडवई यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना जयंत पाटील पुढे म्हणाले, देशात चुकीची राजनीती व आर्थिक नीती सुरू आहे, जीएसटी मुळे साध्या जीवनावश्यक गोष्टी देखील महागल्या आहेत. महायुतीचे राजकारण केवळ लाडक्या खुर्चीसाठी चालले महाविकास आघाडीला सत्तेत येण्याचा पूर्णपणे आत्मविश्वास आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

शरद लेंडे म्हणाले की, पक्षाचा एबी फार्म सत्यशिल शेरकर यांना मिळाला. पक्षाकडे अनेकजण इच्छुक होते पण पक्षाचा आदेश मानून आम्ही अर्ज दाखल केला नाही. सेनेचे तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे यांनी अर्ज दाखल केला. त्यांनीही पक्षाचा आदेश मानून अर्ज मागे घेतला. सर्वजण ताकदीने लढून सत्यशिल शेरकर यांनि निवडून आणणार आहोत.
शिवसेनेचे तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे यावेळी म्हणाले की, सेनेला तिकिट मिळावी म्हणून आग्रही होतो. पक्षप्रमुख यांचा आदेश मानून माघार घेतली. शिवसेनेचे सैनिक महाविकास आघाडीचे काम करत आहोत. शिवसेना वाचविण्यासाठी आम्ही भक्कम आहोत. अपक्ष उमेदवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टिका केली.(Junnar)

महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशिल शेरकर म्हणाले की, महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या सर्वजणांनी ठरविले होते की, ज्याला उमेदवारी मिळेल त्याचे एकदिलाने काम करण्याचे ठरविले. तालुक्यात सेनेची ताकद आहे, त्याचाही हक्क होता पण आज सेना सर्व ताकदीने काम करत आहेत, दुष्काळी परिस्थितीत कारखान्यांना मदत केली. रोजंदारीचा प्रश्न गंभीर आहे, याकडे लक्ष देणार आहोत. पर्यटन तालुका जाहिर झाला पण निधी मिळाला नाही तर रोजगार ही मिळाला नाही.

Junnar

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन जाहीर

नताशा स्टँकोविक हिचा हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा

शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून अश्लील व्हिडीओ शूट

गुन्हेगारी संपवू ,बेरोजगारी संपवू, विकासाचे सर्व प्रश्न हाताळू – रोहित पवार

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

धक्कादायक : सांगलीत कुऱ्हाडीने वार करून भाजप नेत्याची निर्घृण हत्या

अकोल्यातील सभेत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; गरिबांना पक्के घर देणार

महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा

फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर

संबंधित लेख

लोकप्रिय