Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : गुणवंत कामगार वतीने श्रमप्रतिष्ठा दुचाकी जागर फेरी

PCMC : गुणवंत कामगार वतीने श्रमप्रतिष्ठा दुचाकी जागर फेरी

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीच्या वतीने एक मे कामगार दिनाचे औचित्य साधून पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे स्मृती जागर करीत बजाज ऑटोचे शहीद कामगार दत्तात्रय पाडळे यांच्या आकुर्डी येथील पुतळ्यापासून ते कॉम्रेड रुपमय चटर्जी यांच्या पुतळ्यापर्यंत कामगारांची श्रमप्रतिष्ठा दुचाकी जागर फेरी काढण्यात आली. (PCMC)

पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीचे पंकज पाटील, संगीता जोगदंड, विकास कोरे, आण्णा गुरव, अरुण परदेशी, शामराव सरकाळे, आण्णा जोगदंड, भाऊसाहेब गायकवाड, सुरेश कंक यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

शहीद दत्ता पाडळे यांच्या पुतळ्याला भावपुर्ण पुष्पांजली अर्पण करून कामगार श्रमप्रतिष्ठा फेरीची सुरुवात झाली.

याप्रसंगी आप्पा बागल, ह. भ. प. अशोकमहाराज गोरे, वसंत कामथे, दिनकर मोरे, लक्ष्मण शिंदे, शिवाजी पाटील, बळीराम शेवते, दिनकर पाटील, अमोल लोंढे, मालोजी भालके, अनिल हराळे, अमित निंबाळकर, आनंद निकम, बाळासाहेब साळुंके, दत्तात्रय गायकवाड उपस्थित होते.

कॉम्रेड रुपमय चटर्जी यांच्या पुतळ्याजवळ सांगता कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक आणि कामगार नेते अरुण बोऱ्हाडे म्हणाले. ” देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. अजूनही आपण श्रमाला योग्य मोबदला देऊ शकत नाही. प्राथमिक मानवी गरजा रोटी, कपडा और मकान आहेत याच गरजांची पूर्तता व्हावी म्हणून श्रमिक कामगार घाम गाळतो. त्यांच्या श्रमाला योग्य मोबदला देण्याचे काम शासन आणि कामगार संघटनांचे आहे.

पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीचे अध्यक्ष प्रकाश घोरपडे म्हणाले की” गेल्या पंचवीस वर्षापासून गुणवंत कामगार विकास समिती आपल्या पिंपरी चिंचवड शहरात पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण काम करीत आहे.

यासाठी तळेगाव इंदुरी जवळील जांबे गाव पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीने दत्तक घेतले होते. श्रमदान करून कामगारांनी तेथे रस्ते बनवले, एसटी महामंडळाला अर्ज सादर करून त्या गावासाठी एसटी ची सुविधा उपलब्ध करून दिली. तेथील शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप नियमित केले.” pcmc news

पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीचे आण्णा जोगदंड म्हणाले “पिंपरी चिंचवड महापालिकेने (PCMC) पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे आणि कॉम्रेड रुपमय चटर्जी यांच्या नावाने साहित्य कला दालन शहरात उभे केले पाहिजे.” पद्मश्री नारायण सुर्वे, कॉम्रेड रुपमय चटर्जी यांचे विचार लोकाभिमुख होण्यासाठी सर्व कामगारांनी मोलाची भूमिका बजावली पाहिजे.”

ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के म्हणाले सध्या कामगार कडे पाहण्याचा दृष्टिकोन भेदभावाच आहे मालक धार्जिणे कायदे करून कामगार देशोधडीला लावण्याचे काम सध्या चालू आहे.

यावेळी वृक्षमित्र अरुण पवार म्हणाले की, कोणतेही काम हे लहान मोठे नसते कामाप्रती प्रामाणिकपणा असावा त्यातच कामगारांचे हित आहे. रूपमय चटर्जी यांनी पश्चिम बंगाल मधून येऊन कामगार हिताचे जे कार्य केले आहे याची तुलना आपणाला कशातही करता येणार नाहीत कामगार हितासाठी चटर्जी सारख्या कामगार नेत्याची देशाला आज गरज असल्याचे पवार यांनी सांगितले.गुणवंत कामगार सुभाष चव्हाण यांनी आभार मानले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुली राजकारणात उतरली, ‘या’ पक्षात केला प्रवेश

ब्रेकिंग : मिमिक्री आर्टिस्ट श्याम रंगीला पंतप्रधान मोदींच्या विरोधात लढणार निवडणूक

निवडणूकीच्या अगोदर अरविंद केजरीवाल यांना अटक का ? सर्वोच्च न्यायालयाचे ईडीला ५ प्रश्न

काँग्रेस मुख्यालयावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचताही येईना, प्रश्न विचारताच विद्यार्थ्यांची फजिती

ब्रेकिंग : महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात बदल

ब्रेकिंग : अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

ब्रेकिंग : कोरोना लसीचे प्रकरण सर्वोच्च न्यायलायात, बाधितांना भरपाई देण्याची मागणी

मोठी बातमी : माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

सर्वात मोठी बातमी : 100 हून अधिक शाळांत बॉम्ब ठेवल्याची धमकी, एकच खळबळ

संपत्तीसाठी लालची मुलाने बापाला बेदम मारले, व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय