Friday, May 17, 2024
Homeताज्या बातम्याCOWIN Certificate: लस प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवला, चर्चेला उधान

COWIN Certificate: लस प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवला, चर्चेला उधान

COWIN Certificate : सध्या जगभरात कोरोना महामारीच्या काळात दिल्या गेलेल्या लसी संदर्भांत जोरदार चर्चा सुरू आहे. कोरोना महामारीच्या काळात जगातील अनेक कंपन्यांनी कोविड-19 विषाणूपासून बचाव करण्यासाठी घाईघाईने कोविड लस तयार केली. त्यापैकी एक ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी AstraZeneca होती. AstraZeneca आणि Oxford University यांनी संयुक्तपणे कोरोनाची लस विकसित केली आहे. आता या कंपनीने साईड इफेक्ट संदर्भात धक्कादायक खूलासा केला आहे.

AstraZeneca कंपनीने ब्रिटीश न्यायालयात कबूल केले आहे की लस दिल्यामुळे, क्वचित प्रसंगी, लसीकरणानंतर रक्त गोठणे आणि प्लेटलेटची संख्या कमी होऊ शकते. या सोबतच ह्रदयविकाराच्या झटक्याच्या घटना घडू शकतात. AstraZeneca कंपनीने युरोपमधील वॅक्सजाव्हरिया आणि भारतातील पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने कोविशील्ड (Covishield Vaccine) या नावाने बनवली गेली. या लसीच्या साईड इफेक्ट बाबत जगभरात वातावरण तापले असून कोविशील्ड लसीच्या (Covishield Vaccine) सुरक्षेच्या बाबींचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. असे असताना भारताच्या राजकीय क्षेत्रातही काही घटना घडू लागल्या आहेत.

देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका सुरू असतानाच कोरोना लसीच्या साईड इफेक्ट संदर्भात बातम्या येऊ लागल्या आहेत. अशात कोरोना लस प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढून टाकण्यात आला आहे. यावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करायला सुरूवात केली आहे. कोरोना लसीचे साईड इफेक्ट समोर येताच मोदी घाबरले असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.

COWIN Certificate

यापूर्वी प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोसोबत ‘दवाई भी कड़ाई भी’ असे लिहलेले असत. मात्र आता लस प्रमाणपत्रावरून नरेंद्र मोदींचा फोटो काढून टाकण्यात आला आहे.

यावर आता भाजपकडून देखील प्रतिक्रिया आली आहे. भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी देशाविरुद्ध आणि पंतप्रधानांच्या विरोधात अफवा पसरवताना काँग्रेसचे चमचे टॉप क्लास आहेत, अशी टीका केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लक्षात घेता कोरोना लस प्रमाणपत्रावरून (COWIN Certificate) पंतप्रधान मोदींचे छायाचित्र काढून टाकण्यात आले आहे. याआधीही 2022 मध्ये अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत्या तेव्हा पंतप्रधान मोदींचा फोटो काढून टाकण्यात आला होता. असं प्रत्यूत्तर सुधांशू त्रिवेदी यांनी दिले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व सरकारी वेबसाइटवरून पंतप्रधान मोदींची छायाचित्रे हटवण्यात आली आहेत. त्यामुळे लस प्रमाणपत्रावरून (COWIN Certificate) पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढून टाकण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुली राजकारणात उतरली, ‘या’ पक्षात केला प्रवेश

ब्रेकिंग : मिमिक्री आर्टिस्ट श्याम रंगीला पंतप्रधान मोदींच्या विरोधात लढणार निवडणूक

निवडणूकीच्या अगोदर अरविंद केजरीवाल यांना अटक का ? सर्वोच्च न्यायालयाचे ईडीला ५ प्रश्न

काँग्रेस मुख्यालयावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचताही येईना, प्रश्न विचारताच विद्यार्थ्यांची फजिती

ब्रेकिंग : महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात बदल

ब्रेकिंग : अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

ब्रेकिंग : कोरोना लसीचे प्रकरण सर्वोच्च न्यायलायात, बाधितांना भरपाई देण्याची मागणी

मोठी बातमी : माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

सर्वात मोठी बातमी : 100 हून अधिक शाळांत बॉम्ब ठेवल्याची धमकी, एकच खळबळ

संपत्तीसाठी लालची मुलाने बापाला बेदम मारले, व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय