Thursday, May 2, 2024
Homeआंतरराष्ट्रीयभरदिवसा पृथ्वीवर होणार तब्बल ४ मिनिट अंधार, वाचा काय आहे कारण !

भरदिवसा पृथ्वीवर होणार तब्बल ४ मिनिट अंधार, वाचा काय आहे कारण !

Solar Eclipse : सूर्यग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे ज्यामध्ये चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये येतो आणि सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडण्यापासून रोखतो. सूर्यग्रहणाच्या बाबतीत महत्त्वाची माहिती घेतली तर यामध्ये असे दिसून येते की प्रत्येक 18 महिन्यांनी या पृथ्वीतलाच्या कुठल्यातरी भागामध्ये सूर्यग्रहण (Solar Eclipse) होत असते. जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये सरळ रेषेत बिंदू म्हणून येतो तेव्हा चंद्राची सावली सूर्यावर पडते व सूर्य झाकवला जातो व त्यालाच आपण ग्रहण म्हणतो.

या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिल रोजी होणार आहे. दरवेळी होणाऱ्या सुर्यग्रहणा पेक्षा हे सुर्यग्रहण खास असणार आहे. हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी जगभरातील लोक याबाबत खूप उत्सुक आहेत. हे सूर्यग्रहण 8 एप्रिल रोजी रात्री 09:12 वाजता सुरू होईल आणि मंगळवार, 9 एप्रिल रोजी पहाटे 02:22 वाजता समाप्त होईल. हे सूर्यग्रहण उत्तर अमेरिकेच्या काही भागांमध्ये संपूर्णपणे दिसणार आहे व त्या ठिकाणी चार मिनिट नऊ सेकंद इतका वेळ पूर्ण अंधार असणार आहे. मात्र हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.

या सूर्यग्रहणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे कॅनडा, तर अमेरिकेपासून मेक्सिकोपर्यंत दिसू शकणार आहे. ग्रहणाचा कालावधी बराच मोठा असल्यामुळे नासाच्या शास्त्रज्ञांनी या कालावधीत वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करण्याचे नियोजन केले आहे. या बाबतीत जगातील शास्त्रज्ञच नव्हे तर काही संस्था देखील वेगवेगळे प्रयोग करणार आहेत.

ग्रहणाची अमेरिकेत क्रेझ इतकी आहे की ते पाहण्यासाठी न्यूयॉर्क शहरातील 6 कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कैद्यांनी ग्रहण पाहण्याची परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला होता.

सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतील, ज्यामुळे दिवसा अंधार पडेल, कारण चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकेल. एकूण चार मिनिटे सूर्य झाकून राहील.

सूर्यग्रहणाचे प्रकार:

पूर्ण सूर्यग्रहण: चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकतो आणि पृथ्वीवरील काही भाग काही मिनिटांसाठी अंधारात जातो.
खंडग्रास सूर्यग्रहण: चंद्र सूर्याचा काही भाग झाकतो आणि पृथ्वीवर आंशिक सावली निर्माण होते.
कंकणाकृती सूर्यग्रहण: चंद्र सूर्याच्या मध्यभागी येतो आणि सूर्याभोवती एका चमकदार अंगठीचा प्रभाव निर्माण करतो.
संकर सूर्यग्रहण: हे पूर्ण आणि खंडग्रास सूर्यग्रहणाचे मिश्रण आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

धक्कादायक : ‘तुम्ही दोघे वेगवेगळ्या धर्माचे असताना एकत्र का फिरता’ म्हणत पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना मारहाण

निवडणूक आणि प्रचार ; राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी

मुद्रीत माध्यमाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक

समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या ४ जणांना नोटीस, १३ जणांचा शोध सुरू

मोठी बातमी : शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

मोठी बातमी : एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपमध्ये घर वापसी होणार

मोठी बातमी : कल्याण लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांकडून उमेदवार जाहीर

वेळ पडल्यास उमेदवारांना हॅलिकॉफ्टरने आणू, हसन मुश्रीफ यांचे मोठे विधान

मोठी बातमी : श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय