Friday, May 17, 2024
Homeताज्या बातम्याSupriya Sule : बारामतीत सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का

Supriya Sule : बारामतीत सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का

Baramati : बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एका मोठ्या नेत्याने शरद पवारांची साथ सोडली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सोनाई डेअरीचे चेअरमन प्रवीण माने (Praveen Mane) यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सोनाई डेअरीचे चेअरमन प्रवीण माने (Praveen Mane) यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज पत्रकार परिषद घेत अजित पवारांना साथ देणार असल्याचे प्रवीण माने यांनी स्पष्ट केले आहे.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रवीण माने हे सुप्रिया सुळेंचा प्रचार करत होते. इंदापूरच्या प्रचाराची आखणी त्यांनी केली होती. प्रवीण माने हे शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात. सोनाई दूध डेअरीच्या माध्यमातून दशरथ माने आणि त्यांचे पुत्र प्रवीण माने यांनी इंदापूर तालुक्यातील अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. (Baramati) लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये माने यांची महत्त्वपूर्ण भूमिका मानली जाते.

प्रवीण माने हे काल-परवापर्यंत सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत होते. मात्र, अचानक त्यांनी पत्रकार परिषदेत घेत आपली भूमिका बदलत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ देत सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, इंदापूरच्या मेळाव्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोनाईच्या प्रवीण माने यांच्याकडे चहापान केलं होतं. अचानक प्रवीण मानेंच्या घरी फडणवीस दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलल्याचं दिसत आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

मोठी बातमी : एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपमध्ये घर वापसी होणार

मोठी बातमी : कल्याण लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांकडून उमेदवार जाहीर

वेळ पडल्यास उमेदवारांना हॅलिकॉफ्टरने आणू, हसन मुश्रीफ यांचे मोठे विधान

मोठी बातमी : श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

अभिनेत्री कंगना रणौत झाली होती बारावीत नापास, आज भाजपची लोकसभेची उमेदवार

कंगना राणौतने भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून घेतले ‘यांचे’ नाव, लोक करताहेत ट्रोल

आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय