Wednesday, May 22, 2024
Homeताज्या बातम्याShrikant Shinde : श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

Shrikant Shinde : गेल्या काही दिवसांपासून कल्याण लोकसभा जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव होता. महायुतीतील शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी या जागेवार दावा केला आहे. त्यामुळे कल्याणची जागा कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत महत्वाचे विधान केले आहे.

भाजप आणि शिंदे गटाने जाहीर केलेल्या आता पर्यंतच्या कोणत्याच यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचा मतदार संघ असलेला कल्याणच्या जागेवर महायुतीतील कोणताच उमेदवार जाहीर करण्यात आलेला नव्हता. कल्याण लोकसभा मतदारसंघातील जागा श्रीकांत शिंदेंऐवजी भाजपला द्यावी, अशी मागणी शुक्रवारी कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे केली होती. आज मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा केली आहे. आज (6 मार्च) नागपूरातील सभेत एका बोलताना त्यांनी ही घोषणा केली.

दरम्यान, श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर भाजपच्या स्थानिक कार्यक्रत्यांमध्ये नाराजी आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिँदे यांच्यासाठी काम न करण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे.

तसेच, या लोकसभा जागेवरून भाजपच्या उमेदवाराने निवडणूक लढवावी, असं भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अभिनेत्री कंगना रणौत झाली होती बारावीत नापास, आज भाजपची लोकसभेची उमेदवार

कंगना राणौतने भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून घेतले ‘यांचे’ नाव, लोक करताहेत ट्रोल

आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध!

बापरे! कोरोना नंतर चीनमधून “ही “नवीन समस्या जगात विध्वंस पसरवणार

भरघोस उत्पादन देणारी अशी करा उन्हाळी भुईमूग लागवड

ब्रेकिंग: शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर!

कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

DME : वैद्यकीय शिक्षण संचालनालय अंतर्गत 233 जागांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय