Kangana Ranaut : कंगना रणौत ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कंगना तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच तिच्या बोलक्या शैलीसाठी ओळखली जाते. कंगनाने आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली. कंगनाने 2006 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. कंगना जवळपास 18 वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे.
कंगनाचा (Kangana Ranaut) जन्म 1987 मध्ये हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात झाला. कंगना राजपूत कुटुंबातील आहे. कंगनाला मोठी बहीण रंगोली आणि लहान भाऊ अक्षत आहे. कंगनाचे वडील बिझनेसमन आहेत आणि आई शाळेत शिक्षिका आहे. आज इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कंगनाला तिने अभिनेत्री व्हावे असे कधीच वाटले नव्हते. याचा खुलासा खुद्द कंगनाने एका मुलाखतीत केला आहे.
कंगनाच्या वडिलांची इच्छा होती की तिने डॉक्टर व्हावे, पण कंगना बारावीत नापास झाली. सुरुवातीपासूनच अभिनेत्री बनण्याची इच्छा असलेली कंगना आई-वडिलांशी भांडण करून मुंबईत आली.
2006 मध्ये ‘गँगस्टर’ चित्रपटातून कंगनाला बॉलिवूडमध्ये संधी मिळाला. तिने इमरान हाश्मी आणि शायनी आहुजा यांच्यासोबत पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. यानंतर कंगनाने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. कंगनाने अनेक यशस्वी चित्रपट केले आहेत, ज्यात बहुतांशी स्त्री-आधारित चित्रपट आहेत. ‘फॅशन’ चित्रपटासाठी कंगनाला पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार मिळाला तेव्हा कंगना केवळ 22 वर्षांची होती. यानंतर त्यांना ‘क्वीन’ आणि ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ सारख्या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. कंगनाने हिट सिनेमे दिलेच, पण तिच्या फ्लॉप सिनेमांची यादीही मोठी आहे.
बारावीत नापास झाली होती कंगना
कंगनाची आई शाळेत शिक्षिका होत्या. घरात राजकीय पार्श्वभूमी होती. मात्र कंगनाला अभ्यासात कधीच रस नव्हता. ती बारावीतही नापास झाली होती. त्यानंतर हिरोईन व्हायचं म्हणून घर सोडून ती मुंबईत आली.


हे ही वाचा :
आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध!
बापरे! कोरोना नंतर चीनमधून “ही “नवीन समस्या जगात विध्वंस पसरवणार
भरघोस उत्पादन देणारी अशी करा उन्हाळी भुईमूग लागवड
ब्रेकिंग: शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर!
कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल
DME : वैद्यकीय शिक्षण संचालनालय अंतर्गत 233 जागांसाठी भरती