Friday, May 17, 2024
Homeताज्या बातम्याधक्कादायक : डे नाईट ड्यूटी करण्यास नकार दिल्याने दलित तरूणाला ऍसिड टाकून...

धक्कादायक : डे नाईट ड्यूटी करण्यास नकार दिल्याने दलित तरूणाला ऍसिड टाकून जाळले

Latur : लातूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका दलित तरुणाचा मृतदेह ऍसिड टाकून जाळलेल्या अवस्थेत सापडलेला आहे. डे नाईट ड्यूटी करण्यास नकार दिल्याने त्याला जाळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सचिन लामतुरे असे या तरूणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. Latur News

मातंग समाजातील तरूण सचिन लामतुरे हा औसा रोडवर असणार्‍या लॉजमध्ये काम करत होता. मात्र त्याच्याकडे दिगांबर साबणे याच्यासह अन्य एकाने डे नाईट ड्यूटी कर, नाही तर उचल दिलेले पैसे परत कर म्हणून तगादा लावला. यावरून दोघांत भांडण झाले. यानंतर सचिन लामतुरे याचा मृतदेह ऍसिड टाकून जाळलेल्या अवस्थेत सापडलेला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातुरातील औसा रोडवरील एका लॉजवर सचिन राजू लामतुरे (२८, रा. निटूर, ता. निलंगा) हा काम करीत होता. दरम्यान, दिगंबर साबणे याच्यासह अन्य दोघांनी सचिनला लॉजवर डे-नाईट ड्युटी करण्यासंदर्भात तगादा लावला. सचिनने त्यास नकार दिला. त्यावरून डे-नाईट ड्युटी कर, नाही तर उचल घेतलेले पैसे परत कर, या कारणावरून छत्रपती चौक ते कव्हा तलावाकडे जाणार्‍या रस्त्यावर त्याचा खून करून मृतदेह अर्धवट जाळल्याच्या स्थितीत आढळून आला.

पोलिसांसमोर अनोळखी मृतदेह म्हणून ओळख पटविण्याचे आव्हान होते. परंतु शेवटचा कॉल रेकॉर्ड तपासले असता पूर्ण खूनाचा उलगडा झाला. याबाबत राजू बाबुराव लामतुरे यांच्या तक्रारीवरून दिगंबर साबणे याच्यासह अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. एका आरोपीला अटक केली आहे.

दरम्यान, पोलिसी खाक्या दाखविताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. इतर दोन अनोळखी आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. त्यांनाही लवकरच अटक केली जाईल. अवघ्या २४ तासांत खुनाचा उलगडा करण्यात यश आले असल्याचे लातूरचे पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी सांगितले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

मोठी बातमी : एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपमध्ये घर वापसी होणार

मोठी बातमी : कल्याण लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांकडून उमेदवार जाहीर

वेळ पडल्यास उमेदवारांना हॅलिकॉफ्टरने आणू, हसन मुश्रीफ यांचे मोठे विधान

मोठी बातमी : श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

अभिनेत्री कंगना रणौत झाली होती बारावीत नापास, आज भाजपची लोकसभेची उमेदवार

कंगना राणौतने भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून घेतले ‘यांचे’ नाव, लोक करताहेत ट्रोल

आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय