Thursday, May 2, 2024
Homeताज्या बातम्याRaju Waghmare : काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिंदेंच्या...

Raju Waghmare : काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Raju Waghmare : लोकसभा निवडणूकीपुर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाची रोखठोक भुमिका मांडणारे काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला.

काँग्रेस (Congress) प्रवक्ते राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी अनेक वर्षे काँग्रेसचे प्रवक्तेपद सांभाळले. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याअगोदरच राजू वाघमारे काँग्रेससह मविआला मोठा धक्का दिला.

राजू वाघमारे हे अनेक वृत्तवाहिन्यांवरील चर्चांच्या कार्यक्रमांत सहभागी होत आपल्या पक्षाची बाजू मांडताना दिसत होते. अशातच आता त्यांनी काँग्रेसची साथ सोडली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेची कास धरली आहे. त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षाची सध्या होत असलेली फरफट आणि पक्षातील काही नेत्यांच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून मी पक्ष सोडत असल्याचे राजू वाघमारे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस काम करते का? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले की, मी माझं भाग्य समजतो, मुख्यमंत्र्यांनी मला संधी दिली. छत्रपतींचं स्वप्न साकार करण्यासाठी मी शिंदेंसोबत आहे. काँग्रेस पक्ष, उबाठातील हजारो कार्यकर्ते आहेत, ज्यांना नेता नाही. हे सर्व एसीमधले नेते आहेत, शिंदे तळागळातले नेते आहेत, असंही वाघमारे म्हणाले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : महाविकास आघाडीची पत्रकार परिषद, वाचा कोणत्या पक्षाला किती जागा !

भाजपच्या बड्या नेत्याने घेतली सलमान खानची भेट, राजकिय वर्तूळात जोरदार चर्चा

सीमा हैदरला पतीकडून जबर मारहाण ; डोळा काळानिळा, चेहरा सुजला ?

विरोधकांनी फक्त परिवाराचाच विकास केला – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुण्यात नोकरी शोधताय? सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

मोठी बातमी : अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांवर हल्ला, राष्ट्रवादी भाजपविरोधात आक्रमक

भरदिवसा पृथ्वीवर होणार तब्बल ४ मिनिट अंधार, वाचा काय आहे कारण !

धक्कादायक : ‘तुम्ही दोघे वेगवेगळ्या धर्माचे असताना एकत्र का फिरता’ म्हणत पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना मारहाण

निवडणूक आणि प्रचार ; राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय