Sunday, May 5, 2024
Homeताज्या बातम्याSalman Khan : भाजपच्या बड्या नेत्याने घेतली सलमान खानची भेट, राजकिय वर्तूळात...

Salman Khan : भाजपच्या बड्या नेत्याने घेतली सलमान खानची भेट, राजकिय वर्तूळात जोरदार चर्चा

Salman Khan : भाजपच्या बड्या नेत्याने घेतली सलमान खानची भेट घेतली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष व वांद्रे पश्चिम विधानसभेचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी नुकतीच अभिनेता सलमान खान (Salman Khan) ची भेट घेतली आहे. या भेटीमुळे चर्चेला उधान आले आहे.

भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सोमवारी अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि पटकथाकार – लेखक सलीम खान यांची भेट घेतली. या भेटीची स्वत: आशिष शेलार यांनी ‘एक्स’ वर फोटो पोस्ट करत माहिती दिली आहे. आशिष शेलार यांनी पोस्ट मध्ये म्हटले आहे की, सलीम खान, हेलनजी आणि सलमानच्या भेटीमुळं आनंद झाला. त्यांच्या कुटुंबासोबत स्नेहभोजन घेतलं. आरोग्याच्या क्षेत्रात व गोरगरिबांसाठी सलीम खान गेल्या अनेक वर्षांपासून करत असलेल्या कार्याची माहिती घेतली व त्यांच्याशी चर्चा केली, असं शेलार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सर्वत्र सुरू आहे. काही मतदारसंघात अद्यापही उमेदवार घोषित करण्यात आलेले नाहीत. आशिष शेलार यांचा विधानसभा मतदारसंघ ज्या लोकसभा मतदारसंघात येतो, त्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे आशिष शेलार यांनी घेतलेल्या या भेटीला विशेष महत्व आले आहे. राजकीय वर्तुळात देखील याची जोरदार चर्चा सुरू आहे.

२०१४ आणि २०१९ मध्ये उत्तर मध्य मुंबई लोकसभेचं प्रतिनिधित्व भाजपच्या पूनम महाजन करत आहेत. यंदा मात्र त्या जागी आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र अद्याप घोषणा झालेली नाही. असे असताना देशभरात भाजपनं अनेक कलाकारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळं शेलार यांच्या या भेटीची चर्चा आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

पुण्यात नोकरी शोधताय? सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

मोठी बातमी : अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांवर हल्ला, राष्ट्रवादी भाजपविरोधात आक्रमक

भरदिवसा पृथ्वीवर होणार तब्बल ४ मिनिट अंधार, वाचा काय आहे कारण !

धक्कादायक : ‘तुम्ही दोघे वेगवेगळ्या धर्माचे असताना एकत्र का फिरता’ म्हणत पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना मारहाण

निवडणूक आणि प्रचार ; राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी

मुद्रीत माध्यमाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक

समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या ४ जणांना नोटीस, १३ जणांचा शोध सुरू

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय