Saturday, May 4, 2024
Homeजुन्नरJunnar : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

Junnar : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

Junnar : सध्या राज्यात चांगलाच उन्हाचा कडाला वाढला आहे. उन्हापासून आराम मिळण्यासाठी अनेकजण बर्फाचा गोळा, फळांचे रस, ऊसाचा रस किंवा सरबत घेतात. यासाठी व्यावसायिक बर्फाचा वापर मोठ्या करतात. मात्र एका व्यावसायिकाने आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जुन्नर तालुक्यातील (Junnar) ही घटना असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

जुन्नर तालुक्यातील बेल्हे या परिसरात एक ज्यूस, सरबत बनवणारा व्यावसायिक आहे. त्याने व्यावसायासाठी बर्फाची लादी आणली होती. या लादीमध्ये चक्क मेलेला उंदीर आढळून आला आहे. हाच बर्फ टाकून अनेक ठिकाणी ग्राहकांना सरबत, गोळा, ऊसाचा रस अशी पेय देण्यात आली आहेत. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर सापडल्याने बर्फ बनविणाऱ्या कारखान्यामध्ये होत असलेला हलगर्जीपणा यातून दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी संबधित खात्याने लक्ष घालून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, याआधी पुण्यातील एका नामांकित कंपनीतल्या कॅन्टीनमध्ये समोशात चक्क कंडोम आढळून आले होते. या घटनेमुळे खळबळ उडाली होती.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !

ब्रेकिंग : बसचा भीषण अपघात ; ५० फूट खोल दरीत बस कोसळली, १४ जणांचा मृत्यू

मोठी बातमी : भाजपला पाठिंबा देताच राज ठाकरेंना मोठा धक्का

मोठी बातमी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोठी घोषणा

मोठी बातमी : अरविंद केजरीवाल यांना दिल्‍ली उच्‍च न्यायालयाचा मोठा झटका

काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मोठी बातमी : महाविकास आघाडीची पत्रकार परिषद, वाचा कोणत्या पक्षाला किती जागा !

भाजपच्या बड्या नेत्याने घेतली सलमान खानची भेट, राजकिय वर्तूळात जोरदार चर्चा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय