Saturday, May 18, 2024
Homeताज्या बातम्याHeat waves: हिंद महासागरात उष्ण लाटा, संपूर्ण देशात तापमान वाढ सुरू

Heat waves: हिंद महासागरात उष्ण लाटा, संपूर्ण देशात तापमान वाढ सुरू

Heat waves : पुणे वेध शाळेनुसार, महाराष्ट्र राज्यात पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. कोकणात बहुतांश जिल्ह्यात पुढील 3 दिवस हवामान दमट उष्ण राहणार असून या भागासाठी अलर्ट देण्यात आलेला आहे. तर सोलापुरात, लातूर आणि उस्मानाबाद येथे आज आणि उद्या, बीड येथे उद्या उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. (Heat waves)

पुण्यातील आयआयटीएम संस्थेचे हवामान शास्त्रज्ञ रॉक्सी मॅथ्यू कोल यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास गटाने महासागरातील तापमान वाढीचा अभ्यास केला आहे. त्यानुसार उष्णतेची भविष्यातील वाढ ही एका दशकासाठी दर सेकंदाला, दिवसभरात, दररोज वाढत आहे, अरबी समुद्रासह वायव्य हिंद महासागरात कमाल तापमान वाढ होईल, इंडो-पॅसिफिक प्रदेशात अत्यंत तीव्र हवामानाच्या घटना घडतील, तर सुमात्रा आणि जावा किनाऱ्यावरील तापमान कमी होईल. असे आयआयटीएम संस्थेच्या अभ्यास गटाने म्हंटले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये पृथ्वीचे तापमानही फार मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. त्यामुळे सर्वत्र ग्लोबल वार्मिंगचा इशारा दिला जातो आहे. त्यामुळे दक्षिण आणि उत्तर ध्रुवातील बर्फ वितळण्याची शक्यता आहे. त्यातून महासागरांचीही पातळी वाढते आहे. ही आपल्यासाठी फारच चिंतेची बाबही आहे.

महाराष्ट्रातील कोकण किनारी प्रदेश, खानदेश, मराठवाडा, विदर्भ येथील सरासरी तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील, तर पश्चिम महाराष्ट्रातील तापमान काही औद्योगिक शहरे वगळता तापमान सरासरी ३९ ते ४० अंश राहील, महासागरातील तापमान वाढीमुळे रात्रीचा उकाडा कमी होणार नाही. त्यामुळे यावर्षी संपूर्ण देशभर तापमान उच्च राहणार आहे. असा हवामान तज्ञांचा अभ्यास आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : रोहित वेमुला दलित नसल्याचा पोलिसांचा दावा, सर्व आरोपींना क्लीन चिट

ब्रेकिंग : दलित चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे निधन

धक्कादायक : जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना जिवंत जाळल्याची घटना

ब्रेकिंग : उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दणका; 6 कंपन्यांना नोटिस

मोठी बातमी : शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

मोठी बातमी : 66 प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसचा भीषण अपघात

लोकप्रतिनिधीच्या वेशातील व्यापारी, डॉ. अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवर निशाणा

मोठी बातमी : आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील वाहनाचा अपघात, चौघांचा मृत्यू

मोठी बातमी : ठाकरे गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला, 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय