Thursday, May 2, 2024
Homeताज्या बातम्याDevendra Fadnavis : नाना पटोलेंच्या अपघातानंतर देवेंद्र फडणवीसांचा पटोलेंना फोन

Devendra Fadnavis : नाना पटोलेंच्या अपघातानंतर देवेंद्र फडणवीसांचा पटोलेंना फोन

Devendra Fadnavis : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा काल अपघात झाला. या अपघातानंतर काँग्रेसकडून भाजपवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. या आरोपांवर भाजपने देखील प्रत्यूत्तर देत आरोप फेटाळून लावले. यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची प्रतिक्रिया येत आहे. मी स्वतः नाना पटोलेंना फोन केला होता. विचारपूस केली, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या अपघातानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप करण्यात येत होते. यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, “मला वाटत नाही की नानाभाऊ घातपात वगैरे काही म्हणतील. मी स्वतः नाना पटोलेंना फोन केला होता. विचारपूस केली. आम्ही वेगवेगळ्या पक्षात असू. पण आम्ही एकमेकांचे शत्रू नाही. वैचारिक सामना हा सातत्याने सुरु असतो. असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, नाना पटोले हे आमचे मित्रच आहेत. अपघात झाला आहे आणि त्यांनी मला सांगितलं की मी बचावलो पण अपघात मोठा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अशी परिस्थिती ना उद्भवली आहे ना उद्भवणार आहे. मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मंगळवारी रात्री उशिरा भंडारा जिल्ह्यात त्यांच्या कारला ट्रकने धडक दिल्याने ते थोडक्यात बचावले होते, त्यानंतर काँग्रेसने पटोले यांच्या जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप केला होता. पटोले हे निवडणूक प्रचार आटोपून परतत असताना कारधा गावाजवळ हा अपघात झाला. यात कोणीही जखमी झाले नाही.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !

ब्रेकिंग : बसचा भीषण अपघात ; ५० फूट खोल दरीत बस कोसळली, १४ जणांचा मृत्यू

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय