Wednesday, June 19, 2024
Homeताज्या बातम्याAshish Jaiswal : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा...

Ashish Jaiswal : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

MLA Ashish Jaiswal : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अपघाताची बातमी ताजी असतानाच आता आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. शिवसेना (शिंदे गट) आमदार आशिष जैस्वाल (MLA Ashish Jaiswal) यांच्या गाडीचा अपघात झाला आहे, यात दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

रामटेक विधानसभेचे आमदार आशिष जैस्वाल (Ashish Jaiswal) हे लोकसभा निवडणुकांचा प्रचारासाठी जात असताना त्यांच्या ताफ्यातील वाहनाचा मोठा अपघात झाला. कन्हानजवळ झालेल्या या अपघातात आमदार जैस्वाल यांच्या ताफ्यातील पीएसह दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती माहिती आहे. नागपूरपासून 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या कन्हान परिसरात ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार आशिष जयस्वाल यांच्या भरधाव गाडीचा व समोरील पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहने समोरासमोर ऐकमेकांना धडकली. कन्हान -केरडी रोडवर हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्यांवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच हा अपघात झाला तेव्हा आमदार आशिष जयस्वाल स्वतः कारमधून प्रवास करत नव्हते अशीही माहिती मिळत आहे.

दरम्यान, नाना पटोले हे मंगळवारी रात्री भंडारा येथून प्रचार सभा आटोपून ते सुकळी येथे जात होते. यावेळी भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ते आले असता एक ट्रक भरधाव वेगात आला. या ट्रकने नाना पटोले (Nana Patole) यांच्या गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !

ब्रेकिंग : बसचा भीषण अपघात ; ५० फूट खोल दरीत बस कोसळली, १४ जणांचा मृत्यू

मोठी बातमी : भाजपला पाठिंबा देताच राज ठाकरेंना मोठा धक्का

मोठी बातमी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोठी घोषणा

मोठी बातमी : अरविंद केजरीवाल यांना दिल्‍ली उच्‍च न्यायालयाचा मोठा झटका

काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय