Saturday, May 4, 2024
Homeताज्या बातम्याVishal Patil : महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार

Vishal Patil : महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार

Vishal Patil : महाविकास आघाडीला लवकरच मोठा धक्का बसणार आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाला गेल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे. सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील (Vishal Patil) हे इच्छुक आहेत. या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील संबंध ताणल्याचेही दिसले होते. आता या मतदार संघातून एक नवीन माहिती समोर येत आहे.

महाविकास आघाडीने पुनः एकदा सांगलीच्या जागेबाबत फेरविचार करावा आणि ही जागा काँग्रेसला सोडावी असे आवाहन विशाल पाटील (Vishal Patil) यांनी केले आहे. अन्यथा ते अपक्ष लढणार असल्याची शक्यता आहे. १९ एप्रिलला अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यात बदलाची अपेक्षा काँग्रेसला आहे. त्यामुळे विशाल पाटील हे काँग्रेस पक्षातर्फे देखील एक अर्ज दाखल करणार आहेत. मात्र जर अखेरच्या दिवशीही सांगलीची जागा ठाकरे गटालाच गेली तर मात्र पुन्हा विशाल पाटील (Vishal Patil) अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे विशाल पाटील हे नातू आहेत. तसेच ते सध्या काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष देखील आहेत. सांगली लोकसभेची जागा शिवसेनेला गेली. त्यामुळे विशाल पाटील यांच्याऐवजी महाविकास आघाडीत चंद्रहार पाटलांना सांगली लोकसभेची उमेदवारी मिळाली. यामुळे विशाल पाटील (Vishal Patil) यांचे समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

विशाल पाटील हे सांगली लोकसभा निवडणूक अपक्ष लढवणार आहेत. सोमवारी ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढल्यास आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असे जाहीर केले आहे. त्यामुळे सांगलीच्या लोकसभा मतदारसंघात पुढे काय होणार हे पहावे लागणार आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल

मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक

अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका

वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला

ब्रेकिंग : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय केल्या नवीन घोषणा !

…म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा; कपिल पाटीलांचे शरद पवारांना पत्र

मोठी बातमी : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

धक्कादायक : अनैतिक संबंधला अडथळा ठरत असल्याने गाडी अंगावर घालून तरुणाचा खून

मोठी बातमी : वंचितचे उमेदवार वसंत मोरे घेणार राज ठाकरेंची भेट, मोरे पुन्हा मनसेत जाणार?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

ब्रेकिंग : वंचितला मतदान न करण्याचे महात्मा गांधींच्या पणतूचे आवाहन

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय