Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) संदर्भात एक महत्वाची बातमी येत आहे. सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर चार राऊंड गोळीबार करण्यात आला आहे. बाईकवरून आलेल्या दोघांकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना घडली तेव्हा सलमान खान घरीच होता. पोलीस आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आरोपांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरु आहे.
सलमान खानला याआधी देखील अनेकदा जीवेमारण्याची धमकी देण्यात आली होती. अशात ही गोळीबाराची घटना घडल्याने चाहत्यांकडून देखील चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या तरी या घटनेत कोणी जखमी झाल्याची माहिती नाही. या घटनेनंतर पोलिसांनी सलमान खानच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे. याशिवाय फॉरेन्सिक टीमही तपासासाठी घटनास्थळी पोहोचली आहे.
2023 मध्ये देखील लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमानच्या ऑफिसला धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता. लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानची सुरक्षा वाढवली होती. सध्या सलमानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अलीकडेच लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता-गायक गिप्पी ग्रेवाल यांच्या कॅनडातील निवासस्थानावरही हल्ला केला होता.


हे ही वाचा :
ब्रेकिंग : वंचितला मतदान न करण्याचे महात्मा गांधींच्या पणतूचे आवाहन
ब्रेकिंग : गांधी-आंबेडकरांचे पणतू पुन्हा आमने-सामने !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान
ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर, वाचा कुणाकुणाला मिळाली उमेदवारी !
मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर
प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल
जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू
हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या
ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू
माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत