Saturday, May 4, 2024
Homeजुन्नरJunnar : अनैतिक संबंधला अडथळा ठरत असल्याने गाडी अंगावर घालून तरुणाचा खून

Junnar : अनैतिक संबंधला अडथळा ठरत असल्याने गाडी अंगावर घालून तरुणाचा खून

Junnar : जुन्नर तालुक्यात अनैतिक संबंधला अडथळा ठरत असल्याच्या कारणाने एकाला मोटार गाडी खाली चिरडून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नारायणगाव येथील पुणे – नाशिक महामार्गालगत असलेल्या अयोध्या हॉटेल जवळ ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, मृत साबीर मोहंमद शफी आणि जेबा इरफान फकीर हे दोघेही विवाहित असून एकमेकांचे शेजारी आहेत. साबीर जेबावर एकतर्फी प्रेम करायचा. ते जुन्नर (Junnar) येथे राहतात. जेबा ही कांदळी येथे एका कंपनीत नोकरी करत होती. अभिजित सोनवणे हा तालुक्यात शेतजमीन मोजणीचे काम करतो. प्रवासादरम्यान जेबा आणि अभिजित यांची ओळख झाली. या माध्यमातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.

याची माहिती साबीर मोहंमद शफी ब्यापारी याला झाल्यानंतर साबीर आणि अभिजित यांच्यात वाद झाले. गुरूवारी रमजान सणासाठी अभिजित हा जेबा हिच्या घरी गेला असता तू येथे का आलास? अशी विचारणा करत दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर शुक्रवारी दुपारी पुणे नाशिक महामार्ग लगत असलेल्या आयोध्या हॉटेल जवळ साबीर हा उभा असताना अभिजित याने साबीर मोहंमद शफी ब्यापारी (वय-45, रा. पणसुंबा पेठ, जुन्नर) याच्या अंगावर मोटार गाडी घालून चिरडून खून केला. या घटनेत साबीर याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागली आहे.

नारायणगाव पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे मुख्य आरोपी अभिजित सोनवणे (वय-28 डिंगोरे), सहआरोपी महिला जेबा इरफान फकीर (वय-32,पणसुंबा पेठ) यांना अटक केली आहे. तसेच आरोपींवर भादवी कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून संगनमताने हा गुन्हा केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार करत आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : वंचितला मतदान न करण्याचे महात्मा गांधींच्या पणतूचे आवाहन

ब्रेकिंग : गांधी-आंबेडकरांचे पणतू पुन्हा आमने-सामने !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर, वाचा कुणाकुणाला मिळाली उमेदवारी !

मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर

प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय