Thursday, May 2, 2024
Homeताज्या बातम्याBJP Manifesto: भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय केल्या नवीन घोषणा !

BJP Manifesto: भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय केल्या नवीन घोषणा !

BJP Manifesto : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा (BJP Manifesto) प्रसिद्ध केला आहे. आज (१४ एप्रिल) रोजी दिल्लीत भाजप मुख्यालयात जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

मोदी की गँरंटी भाजपचा संकल्प या नावाने भाजपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यामध्ये गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस यासह मोठ्या घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत.

भाजपाकडून जाहीरनाम्यात करण्यात आलेल्या घोषणा👇

◾ मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहणार.
◾ गरिबांना दिले जाणारे अन्न पौष्टिक समाधानकारक आणि परवडणारे असेल.
◾ ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणले जाईल.
◾ ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्ती, मग तो गरीब, मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय, ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळणार.
◾ मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहणार.
◾ गरीबांसाठी आणखी तीन कोटी घरे बांधणार.
◾ मुद्रा योजनेची व्याप्ती २० लाखांपर्यं वाढवणार
◾ तृतीयपंथी समुदायाला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार.
◾ गुंतवणुकीद्वारे जीवनमान, जीवनाचा दर्जा आणि नोकऱ्यांवर लक्ष देण्याचा प्रयत्न.
◾ घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस पोहोचविणार.
◾ पीएम किसान योजनेचा लाभ या पुढेही दहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार.
◾ सहकारातून समृद्धीच्या दृष्टीकोनातून भाजपा राष्ट्रीय सहकार धोरण आणणार.
◾ देशभरातील दुग्धव्यवसाय आणि सहकारी संस्थांची संख्याही वाढवण्यात येणार.
◾ पंतप्रधान आवास योजनेत आता दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल.
◾ जेनेरिक औषधांची केंद्र आणखी वाढवण्यात येणार.
◾ उज्ज्वला योजनेची सबसिडी पुढील एका वर्षांपर्यंत वाढविण्यात येणार.
◾ महिला खेळाडूंना विशेष सुविधा देणार.
◾ कोट्यवधी लोकांची वीजबील शून्य करण्यावर भर देण्यात येणार.
◾ कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष, देशात फूड प्रोसेसिंग हब बनणार.
◾ महिला सक्षमीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार.
◾ ३ कोटी महिलांना लखपती करणार, महिलांना आयटी, टुरिझमकडे वळवणार.
◾ मुद्रा योजना १० लाखांवरून २० लाखांपर्यंत कर्ज दिले जाईल.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

…म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा; कपिल पाटीलांचे शरद पवारांना पत्र

मोठी बातमी : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

धक्कादायक : अनैतिक संबंधला अडथळा ठरत असल्याने गाडी अंगावर घालून तरुणाचा खून

मोठी बातमी : वंचितचे उमेदवार वसंत मोरे घेणार राज ठाकरेंची भेट, मोरे पुन्हा मनसेत जाणार?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

ब्रेकिंग : वंचितला मतदान न करण्याचे महात्मा गांधींच्या पणतूचे आवाहन

ब्रेकिंग : गांधी-आंबेडकरांचे पणतू पुन्हा आमने-सामने !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर, वाचा कुणाकुणाला मिळाली उमेदवारी !

मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर

प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय