Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : संजोग वाघेरे पाटील यांनी देहूरोड गुरुद्वारात घेतले दर्शन

PCMC : संजोग वाघेरे पाटील यांनी देहूरोड गुरुद्वारात घेतले दर्शन

शीख बांधवांची भेट घेऊन साधला संवाद

देहूरोड / क्रांतीकुमार कडुलकर : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere Patil) यांनी देहूरोड येथील श्री गुरु सिंग सभा गुरुद्वाराला सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी शीख बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधत मावळ लोकसभा निवडणुकीत पाठबळ देण्याचे आवाहन केले.maval news


संजोग वाघेरे पाटील यांच्यासमवेत देहूरोड येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार ) गटाचे अध्यक्ष मिकी कोचर, कार्याध्यक्ष महेश केदारी, समीर सतेलु, कैलास गोरवे, शिवाजी दाभोळे, रेणू रेडी, महिला अध्यक्षा बॉबी डीका, देहूरोड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहराध्यक्ष भरत नायडू, रमेश जाधव, मावळ तालुका शिवसेना सल्लागार विशाल दांगट पाटील, युवासेना मावळ तालुका सरचिटणीस राजू शेलार, विलास हिनुकूले, मेहरबान सिंग टकी, देहूरोड काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हाजी मलंग, उपाध्यक्ष व्यंकटेश कोळी, अल्पसंख्यांकचे कार्याध्यक्ष हनुमंत हेगडे, मावळ तालुका अध्यक्ष गब्बर शेख, सचिव गोपाळ राव, किसान सेलचे अध्यक्ष संभाजी पिंजन, सहसचिव बबन टोम्पे, गौतम शिंदे, देहूरोड कॉंग्रेस कमिटीचे अल्पसंख्यांक अध्यक्ष असेल गोलंदाजआदी, तसेच शिवेसना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, महाविकस आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते.



श्री गुरु सिंग सभा गुरुद्वारामध्ये विश्वस्तांकडून व शीख बांधवांकडून संजोग वाघेरे पाटील यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शीख बांधवांशी संवाद साधताना संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, “सिंधी बांधव, शीख बांधव यांच्याशी आपले कायमच जवळचे नाते राहिलेले आहे. विस्तारलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात (Maval loksabha 2024) सर्व ठिकाणी मोठ्या संख्याने शीख समुदाय आहे. समुदायाचे स्थानिक प्रश्नांबरोबर देश स्तरावर असंख्य प्रश्न आहे. मागील दहा वर्षात नव्याने समस्या निर्माण करण्याचे काम झाले आहे. अशा समस्या सोडविण्यासाठी, त्या मार्गी लावण्यासाठी आग्रही भूमिका आपण घेवू. ह ही निवडणूक देशासाठी महत्त्वाची असून मावळ लोकसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीत सर्वांचे पाठबळ मिळावे”, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

गुरुव्दारामधील लंगरमध्ये दिली सेवा

संजोग वाघेरे पाटील यांनी गुरुद्वाराला भेट देऊन दर्शन घेतले. त्यावेळी शीख बांधवांशी संवाद साधताना शीख समुदायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या गुरुव्दारामधील लंगरमध्ये देखील ते सहभाग झाले. त्यांनी स्वत: उपस्थितांना जेवण वाढत लंगरमध्ये सेवा केली. maval news

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय