Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्यासाठी "सौंदर्यवती " स्पर्धांचे आयोजन

PCMC : व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्यासाठी “सौंदर्यवती ” स्पर्धांचे आयोजन

लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर ॲक्टिव्हचा अभिनव उपक्रम

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : लायन्स क्लब पिंपळे सौदागर ॲक्टिव्हच्या वतीने
” Ms & Mrs सौंदर्यवती ” स्पर्धा (beauty compitition) आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेची माहिती देताना अध्यक्षा प्रीती बोंडे यांनी सांगितले की,
दोन वयोगटात जरी ही स्पर्धा होणार आहे, या स्पर्धेसाठी प्रायोजकांनी विशेष आर्थिक योगदान दिले आहे, स्त्रियांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आपण ही स्पर्धा घेत आहोत. यातून निधी उभारून पुणे जिल्ह्यातील प्रिस्कुल व प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या आदिवासी पाड्यातील मुलामुलींना शालेय साहित्य, सायकलस व शैक्षणिक खर्चासाठी मदत केली जाणार आहे. असे अध्यक्षा प्रीती बोंडे यांनी सांगितले.PCMC news

महिलांच्या स्पर्धात्मक व्यक्तिमत्व विकासासाठी सौंदर्य स्पर्धा

सौंदर्याच्या जागतिक मानकांमध्ये वर्षानुवर्षे बदल झाले आहेत आणि सौंदर्य स्पर्धाही त्याला अपवाद नाहीत. इथे फक्त सुंदर दिसणे आणि जिंकणे हा निकष नसून तंदुरुस्त शरीर, अष्टपैलू व्यक्तिमत्व, बोलण्याचे कौशल्य (Comunication skills), बुद्धिमत्ता, आहार आणि आरोग्य हे मूलभूत निकष आहेत. प्रत्येक स्त्रिच्या करिअरमध्ये स्पर्धात्मक व्यक्तिमत्व तसेच शैक्षणिक प्रावीण्य आणि उच्च मानसिक स्थिती या गुणासाठी सौंदर्य स्पर्धा (beauty compitition) आयोजित करत आहोत.

सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024, सायंकाळी 4 वाजता, स्थळ – ग दि माडगूळकर सभागृह, पिंपरी चिंचवड येथे या स्पर्धा होणार आहेत, या अभिनव उपक्रमात सामील व्हावे असे आवाहन प्रीती बोंडे यांनी केले आहे. pcmc news

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय