Tuesday, April 30, 2024
Homeजुन्नरJunnar: लाख रुपयांचे सोयाबीनची चोरी; जुन्नर तालुक्यातील घटना

Junnar: लाख रुपयांचे सोयाबीनची चोरी; जुन्नर तालुक्यातील घटना

Junnar : लहरी हवामान, पडलेले बाजारभाव आणि खतेऔषधं व फवारणी खर्चात झालेली वाढ, यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर देखील झाला आहे. अशातच कुमशेत (ता.जुन्नर) येथील शेतकऱ्यांचे लाख रुपयांचे सोयाबीन चोरीला गेल्याची घटना शनिवारी घडली आहे. Junnar News

याप्रकरणी कुमशेत येथील प्रदीप भगत यांनी जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. शेतकऱ्याला बराखीमधील सोयाबीन चोरीस गेल्याने सुमारे लाख रुपयांचा फटका बसला आहे.

सविस्तर वृत्त असे की, कुमशेत गावामध्ये कॅनॉल लगत प्रदीप शिवाजी भगत यांची शेती आहे. शेतातील बराखी मध्ये ४१ पोत्यांत भरून २ हजार २५५ किलो सोयाबीन त्यांनी ठेवले होते. अज्ञात चोरट्यानी बराखी चा दरवाजा तोडून सोयाबीनचे ४१ कट्टे चोरून नेले. ही घटना शनिवार १३ एप्रिल संध्याकाळी साडे सहा ते रविवार १४ एप्रिल सकाळी १० च्या दरम्यान घडली आहे.

प्रदीप भगत यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार जुन्नर पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार भरत मुठे पुढील तपास करीत आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल

मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी

महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय काय आहेत आश्वासने!

Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल

CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत मोठी भरती

मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक

अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका

वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय