Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : मंदिरांमुळेच भारताचा इतिहास व संस्कृती समजते -इंद्रनील बंकापुरे

PCMC : मंदिरांमुळेच भारताचा इतिहास व संस्कृती समजते -इंद्रनील बंकापुरे

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी, महिला विभाग आयोजित चैत्रगौरी कार्यक्रमाचे औचित्य साधून मंदिरांच्या देशा या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते, नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. pcmc news

स्थापत्य आणि पौराणिकत्व यातून मंदिरं साकारली जातात. मंदिरं बांधण्यात स्थपतिंचे महत्त्वाचे स्थान आहे.” स्थपतेः कर्म स्थापत्यम्” असे म्हटले जाते. शास्त्र, कर्म, प्राज्ञ, शिल हे गुण स्थपतिंमध्ये असतिल तर, ते आपल्या बुद्धीच्या जोरावर अद्भुत मंदिरांची रचना करू शकतात. मंदिरं स्वतःला स्वतःची ओळख करून देतात, तसेच त्यामध्ये ब्रहमांडाचं रूप दिसतं. मंदिरामधील शिल्प तंत्रसाधनेचा अभ्यास करण्यासाठी यंत्र म्हणून वापरली जातात. चंद्र व सूर्य यांचा अभ्यास करून विज्ञान आणि गणित यांची सांगड घालून आपली प्राचिन मंदिरं बांधली आहेत हे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर खजुराहो मंदिर, राणी की वाव, वेरूळ लेणी, ओडीसामधले परशुरामेश्वर मंदिर, कोल्हापुरचे महालक्ष्मी मंदिर अशा अनेक मंदिरांचा इतिहास तसेच हिंदू धर्मातील १८ पुराणे, १०८ संख्येचे महत्त्व, प्रत्येक ठिकाणच्या शिल्पांचं महत्त्व, शिल्प कशी पहावी..? या संदर्भात व्याख्याते इंद्रनील बंकापुरे यांनी विस्तृत माहिती दिली. pcmc news

मतदान करताना राष्ट्रीय हिताचा विचार करून १००% मतदान करावे, मतदानाचा हक्क बजावणे हे आपले कर्तव्य, जबाबदारी आणि राष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे असे प्रदीप पाटील यांनी आवाहन केले.

मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथन नायर, व्याख्याते इंद्रनील बंकापुरे,अश्विनी अनंतपुरे,शितल गोखले व मान्यवरांच्या हस्ते देवीचे पुजन करून कार्यक्रमाला प्रारंभ केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपदा पटवर्धन,प्रास्ताविक हर्षदा पोरे, परिचय अनघा कानडे,निवेदन व आभार उज्ज्वला जाधव यांनी केले.

पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. नंतर कैरीची डाळ, पन्हे, हरभरे देऊन उत्साहात हळदीकुंकू साजरे केले. मंडळाचे कार्यकर्ते सह परिसरातील १६० नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय