Friday, May 17, 2024
Homeताज्या बातम्याSharad Pawar: देशाचा कारभार हुकूमशाही पध्दतीने सुरु; महाराष्ट्रातील जनता परिवर्तन करेल –...

Sharad Pawar: देशाचा कारभार हुकूमशाही पध्दतीने सुरु; महाराष्ट्रातील जनता परिवर्तन करेल – शरद पवार

जुन्नर / आनंद कांबळे : महाराष्ट्रात लोकांची मनस्थिती परिवर्तन करण्याची आहे. दहा वर्षात देशाचा कारभार करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे होती, त्यांची काम करण्याची पध्दत पाहून लोक अस्वस्थ आहेत. देशाच्या संविधानाला कोणीही धक्का लावू शकत नाही, हे दाखवून देण्याची ताकद सर्वसामान्यांमध्ये आहे, असे प्रतिपादन जेष्ठ नेते खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं.

ओतूर येथे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत पवार बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे, शरद लेंडे, देवदत्त निकम, शिवसेनेचे बबनराव थोरात, सुरेश भोर, योगेश पाटे, माऊली खंडागळे, काँग्रेसचे माजी आ.दिलीप ढमढेरे, सत्यशील शेरकर आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की, गेली काही दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिंडतोय. जनतेच्या मनात काय आहे हे समजलं. कधी नव्हे इतका शेतकरी अस्वस्थ आहे. शेतकऱ्यांना त्याच्या घामाची किंमत मिळत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या दहा वर्षाच्या राज्यात शेतीसाठी काय केलं असा सवाल करत पवार म्हणाले की, आज या देशातली शेती संकटात आली आहे. या सरकारचं शेतीवरचं लक्ष कमी होत आहे, आत्महत्या वाढायला लागल्यात. मी कृषी खातं १० वर्षे सांभाळले, नंतर मोदींचे राज्य आले. माझ्या काळात शेतकरी हिताचे निर्णय घेतले, मात्र मोदींच्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या.

सत्ता ही लोकांसाठी वापरायची असते, पण आज काय सुरु आहे, असे सांगत पवार पुढे म्हणाले की, या देशाचा कारभार हुकूमशाही पध्दतीने सुरु आहे. मोदींचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वास नाहीये, विरोधकांवर त्यांचा विश्वास नाहीये. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पत्रकारांना सामोरे जायचे, मोदींनी ही दहा वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही.

या देशाची घटना संकटात आणण्याचे काम केलं जात आहे, या देशाची घटना बदलण्याचे काम त्यांना करायचे आहे, आणि म्हणूनच ४०० पार चा नारा ते देतायेत. पण तुमच्या माझ्या हातात आहे की कोणीही घटनेला धक्का देऊ शकत नाही हे दाखवून देण्याची ही वेळ आहे, असेही पवार म्हणाले.

जनतेच्या न्यायहक्कासाठी माझा आत्मा भटकत आहे. पुण्यात नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेला शरद पवारांनी जनतेच्या न्यायहक्कासाठी माझा आत्मा भटकत असल्याचे सांगत उत्तर दिले.

आमच्यावर टीका केल्याशिवाय पंतप्रधान मोदींना झोपच लागत नाही – Sharad Pawar

पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी नेहरूंवर टीका करतात. खरं तर आज नेहरू हयात नाहीत. पण आता आमच्यावर टीका केल्याशिवाय त्यांना झोपच लागत नाही. कधी माझ्यावर टीका करतात, कधी उद्धव ठाकरेंवर टीका करतात, कधी राहुल गांधींवर टीका करतात. असं सांगत पवार म्हणाले की आमच्यावर टीका करा, आमच्या अंगाला काही भोक पडत नाही, असेही पवार म्हणाले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

संपत्तीसाठी लालची मुलाने बापाला बेदम मारले, व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद

WhatsApp वर बिना इंटरनेट पाठविता येणार फाइल्स

अमित शहांचे हेलिकॉप्टर जोरदार वाऱ्यामुळे डगमगले, मोठी दुर्घटना टळली

निवडणूक प्रचारात कोल्हे आढळराव आमनेसामने !

ब्रेकिंग : अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढली, आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह

ब्रेकिंग : वसंत मोरे यांना निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह बहाल

केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा!

NCTE : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, पाकिस्तानी बोटीतून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त

SC, ST, OBC आरक्षण संपुष्टात आणणार अमित शहांचा व्हिडिओ व्हायरल, वाचा काय आहे सत्यता !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय