Tuesday, April 30, 2024
Homeजुन्नरJunnar : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Junnar : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Junnar : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या विचारांची शिकवण सर्वानी अंगिकारावी व त्यानुसारच आयुष्यात वाटचाल करावी असे प्रतिपादन आमदार अतुल बेनके यांनी केले. (Junnar)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित भव्य मिरवणूकीच्या निमित्ताने डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आमदार बेनके यांच्या हस्ते करून मिरवणूकीस सुरवात करण्यात आली. यावेळी उपस्थिताना बेनके यांनी संबोधित केले.

विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, माजी विक्रीकर आयुक्त के. बी. वाघमारे, माजी नगराध्यक्ष शाम पांडे, उज्वला शेवाळे, वैष्णवी चतुर, चंद्रकांत डोके, भाऊ कुंभार,तेजस रोकडे, अविन फुलपगार, श्रीकांत साळवे, अमित रोकडे, अमर चवरे, गौरव रोकडे, रोहित फुलपगार, अकिफ इनामदार, प्रसाद पानसरे, मूर्तिकार यतीन शेटे तसेच भीमअनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानंतर जुन्नर शहरातून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांच्या प्रतिमांची वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महापुरुषांच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला. जुन्नरचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

तत्पूर्वी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्ताने विविध संघटनाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. नेहरू बाजार येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी पुष्पहार अर्पण केला.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सकाळी बुद्धवंदना घेण्यात आली. माजी नगरसेवक मधुकर काजळे, माजी नगरसेविका अलका फुलपगार, सामाजिक कार्यकर्ते संभाजी साळवे, आरपीआय चे पोपट राक्षे, प्राचार्य डॉ.महादेव वाघमारे, अतिश उघडे, सामाजिक कार्यकर्ते अनिल रोकडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. प्रदीप जोशी, अध्यक्ष गणेश वाव्हळ, अशोक खरात आदींनी अभिवादन केले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल

मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी

महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय काय आहेत आश्वासने!

Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल

CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत मोठी भरती

मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक

अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका

वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय