Friday, May 3, 2024
Homeजुन्नरJunnar : वादळी वाऱ्यात ठिणगी पडून २५ जनावरांचा मृत्यू; तर २ जण...

Junnar : वादळी वाऱ्यात ठिणगी पडून २५ जनावरांचा मृत्यू; तर २ जण गंभीर

Junnar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. अवकाळी पावसामुळे अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या जोरदार वादळी वाऱ्यामुळे जुन्नर तालुक्यातील गोद्रे येथे घराला आणि गोठ्याला आग लागल्याची घटना सोमवार (१५ एप्रिल) रोजी घडली. (Junnar)

गोद्रे येथील भिमाजी रेंगडे यांच्या घराशेजारील असलेल्या गवतावर विजेची थिनगी पडून हि आग घराच्या दिशेने आली. ही आग विझवण्यासाठी भीमा बुधा रेंगडे व त्यांच्या पत्नी फसाबई भीमा रेंगडे यांनी धाव घेतली. मात्र जोरदार वाऱ्यामुळे आग आणखी पसरली. ही आग घराच्या दिशेने येत घर आणि घराच्या लगत असलेल्या गोठ्याला लागली. या आगीच्या घटनेत भीमा रेंगडे आणि फसाबई रेंगडे या देखील काही प्रमाणात भाजल्या आहेत. यासोबतच यात एकूण २५ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला.

सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे उडणाऱ्या ठिणगीमुळे गवतावर आग लागली. सुरुवातीला ही आग लहान होती, परंतु वाऱ्याच्या तीव्रतेमुळे ती झपाट्याने पसरली आणि घरापर्यंत पोहोचली. घर आणि गोठ्यात जनावरे होती. आग इतकी प्रचंड होती की जनावरांना बाहेर पडण्यासाठी वेळ मिळाला नाही.

आगीमुळे घराचे मोठे नुकसान झाले आहे. घरातील अनेक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. त्यासोबतच अन्न धान्यांचाही मोठा साठा जळून खाक झाला आहे.

दरम्यान, या घटनेतील जखमींना जुन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णाची प्रकृती पाहता ससून रुग्णालयात पाठविण्यात आले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल

मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी

महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय काय आहेत आश्वासने!

Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल

CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत मोठी भरती

मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक

अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका

वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय