Tuesday, April 30, 2024
Homeजिल्हाPESA Act: तुमचे गाव पेसा क्षेत्रात आहे का ? असेल तर ही...

PESA Act: तुमचे गाव पेसा क्षेत्रात आहे का ? असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची !

PESA Act : ग्रामसभा सक्षम करून ‘पेसा व वनहक्क कायदा’ची उत्तम अंमलबजावणी करणाऱ्या “ग्रामसेवक” यांना बहुरंग, पुणे तर्फे यंदाचा “पेसा पुरस्कार २०२३” (PESA Act) देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन बहुरंग संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुंडलिक केदारी यांनी केले आहे.

पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. या वर्षीचा पेसा पुरस्कारचा विषय ‘पेसा व वनहक्क कायदा अंमलबजावणी’ हा आहे. राज्यातील १३ पेसा जिल्हा परिषद स्तरावर हा पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, असे असून सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

२१ एप्रिल २०१५ चा शासन निर्णय आणि २१ ऑगस्ट २०१५ ची मार्गदर्शक तत्वे केंद्रस्थानी ठेऊन विनियोग सुत्र ‘ब’ तून पेसा व वनहक्क कायदा जनजागृती, प्रशिक्षण, चर्चा सत्र, ऑडिओ, व्हिडिओ माध्यमातून जनजागृती तसेच आदिवासी कला, संस्कृती जतन व संवर्धन या कामांचा पुरस्कारासाठी विचार केला जाणार आहे.

आलेल्या प्रस्तावातून प्रत्येक जिल्ह्यासाठी एका ग्रामसेवकाची निवड केली जाणार आहे. तरी ग्रामसेवकांनी आपला प्रस्ताव दिनांक ३१ मे २०२४ पर्यंत “अध्यक्ष, बहुरंगग २४/५९९, पावन सहकारी हौसिंग सोसायटी, गोखलेनगर, पुणे – ४११०१६. संपर्क – ९४२२३१८३१८” या पत्त्यावर पाठवावेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल

मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी

महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय काय आहेत आश्वासने!

Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल

CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत मोठी भरती

मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक

अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका

वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय